सह्याद्री | चौफेर न्यूज
वणी : श्री रंगनाथ स्वामी नागरी सह. पतसंस्थेची निवडणूक पार पडली. साधारणतः आठवडाभर नाट्यमय प्रचार, मूक सभा, भेटीगाठी चालू होते. आज 26 जूनला सकाळी 8 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
नावाजलेल्या पतसंस्थेचे 36 हजार 187 सभासद मतदार असतांना केवळ 12 हजार 696 म्हणजेच 35 टक्केच झाल्याने दोन्ही पॅनलमध्ये धाकधूक वाढली आहे.
शहरात "रंगनाथ" ची मुख्य शाखा असलेल्या 17 संचालक पदाची निवडणूक घेण्यात आली यावेळी दोन पॅनल रिंगणात आमने सामने उभे होते. विद्यमान अॅड देविदास काळे यांच्या नेतृत्वात जय सहकार पॅनल तर अॅड भास्कर ढवस यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल चे उमेदवार उभे होते.
आज पार पडलेल्या निवडणुकीत संस्थेच्या 14 शाखेतील मतदानाच्या आकडेवारीत कमालीची घट झाल्याची माहिती समोर आले आहे. वणीत 10 हजार 183 एवढी सभासद संख्या असतांना फक्त 4 हजार 466 सभासदांनी मतदानाचा आपला हक्क बजावला आहे.
श्री रंगनाथ स्वामी नागरी सह.पतसंस्थेच्या 14 शाखेचे झालेले मतदान
वणी 10183 पैकी 4466, मारेगाव 2775 पैकी 1592, मुकुटबन 1481 पैकी 665, घाटंजी 2447 पैकी 1093, वरोरा 6148 पैकी 1078, गडचांदूर 2826 पैकी 620, चंद्रपूर 2105 पैकी 742, राजुरा 2219 पैकी 620, मूल 713 पैकी 217, भद्रावती 2551 पैकी 514, चिमूर 1217 पैकी 594, यवतमाळ 606 पैकी 116, आर्णी 301 पैकी 112, भ्रम्हपुरी 613 पैकी 275, एकूण 36187 पैकी 12696 इतके झाले.
'रंगनाथ'ची निवडणूक पडली पार; केवळ 35 टक्के मतदान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 26, 2022
Rating:
