मोहदा येथील सरपंच उपसरपंच यांच्या पुढाकाराने मिळाली दिव्यांगाना आर्थिक मदत

सह्याद्री | चौफेर न्यूज 

वणी : मौजा मोहदा ग्रामपंचायत अंतर्गत येथील दिव्यांगाना (ता.23 जून) रोजी सरपंच वर उपसरपंच यांच्या पुढाकाराने सामान्य फंडातूनमधून दिव्यांगाना आर्थिक मदत धनादेश वाटप करण्यात आले .
मागील दोन वर्षांपासून कोरोना काळात दिव्यांगाना अनेक आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.हाताला काम नसल्याने त्यांची आर्थिक बाब अतिशय हलाकीची होती. त्यामुळे दिव्यांगाची आर्थिक चनचन येथील सरपंचा सौ वर्षा रवींद्र राजूरकर व उपसरपंच श्री सचिन रासेकर यांनी लक्षात घेवून गावातील दिव्यांगाना सामान्य फंडातून 2000/- हजार रुपयाचा लाभ मिळवून दिला.
त्यात विना प्रदीप ढवळे, कुणाल मारोती कनाके, शिवम संतोष पखाले, नंदकुमार नामदेव कुचनकार, विद्या माणिक केळझरकर, नागो नामदेव दूधकोहळ, ओम निकाश बोथले, कल्पना नामदेव मेश्राम अनुसया हरिदास केळझरकर, मारोती परशराम मडावी, प्रवीण मारोती उरकुडे, हेमंत अनिल कुचनकार, अनिल महादेव भुंबर यांचा समावेश आहे.
उपस्थित सदस्य गणेश बोन्डे व गजानन शेलवडे, सौ अर्चना गेडाम, सौ सीमा ढुमणे, सौ बेबीताई उईके, सौ शोभाताई टेकाम, सौ सुवर्णा बोन्डे यांचे मार्फत दिव्यांगाना आर्थिक लाभ देण्यात आला. लाभार्थ्यांनी यावेळी सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांचे मनस्वी आभार मानले. 
मोहदा येथील सरपंच उपसरपंच यांच्या पुढाकाराने मिळाली दिव्यांगाना आर्थिक मदत मोहदा येथील सरपंच उपसरपंच यांच्या पुढाकाराने मिळाली दिव्यांगाना आर्थिक मदत Reviewed by सह्याद्री चौफेर on June 26, 2022 Rating: 5
Powered by Blogger.