कात्री येथे बस स्टॉप परिसरात खुलेआम दारू विक्री

रूस्तम शेख | सह्याद्री चौफेर 

कळंब : दुबार पेरणीचे संकट असल्या मुळे शेतकरी व शेतमजूर हे आर्थिक अडचणीत आले असून व्यसना कडे वळत आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्या होण्याची दाट शक्यता आहे.

याबाबत सविस्तर वृत्त अशी की कळंब तालुक्यातील कात्री येथे बस स्टँड परिसरात अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याने काही व्यक्ती दारू पिऊन अश्लिल भाषेत शिविगाळ करतात त्यामुळे येथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी महिला व शाळेत जाणाऱ्या विदयार्थाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पोलीस विभागाचे या वर नियंत्रण नसल्याने बिट जमादार यांच्या आर्शिवादाने बस स्टॉप परिसरात अवैद्य दारू विक्री खुलेआम सुरु असुन दारू विक्रेत्याचे मनोबल वाढल्याने अरे रावीची भाषा बोलत आहे.
गावात दारू मिळत असल्याने युवा वर्ग , शेतकरी , शेत मजुर व्यसनाधिन होत असुन गावात भांडण तंटे होऊन शांतता भंग होत आहे तसेच दारूचे अतिवेसना मुळे शेतकरी आत्महत्तेचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे.
गावातील बस स्टॉप परिसरातील दारु विक्री बंद करण्या बाबत पोलीस अधिक्षक यवतमाळ यांच्या कडे गावातील काही प्रतिष्ठीत नागरीक , महिला बचत गटाचे कार्यकर्ते निवेदन देणार आहे.
तरी पोलीस विभागाने याची गांर्भियाने दखल घेऊन गावातील दारू विक्री बंद करावी अशी कात्री ग्रामवासीयांची मागणी आहे
कात्री येथे बस स्टॉप परिसरात खुलेआम दारू विक्री कात्री येथे बस स्टॉप परिसरात खुलेआम दारू विक्री Reviewed by सह्याद्री चौफेर on June 26, 2022 Rating: 5
Powered by Blogger.