दुर्भा येथील रेशन दुकानदारास धान्याचा अपहार भोवला

सह्याद्री | चौफेर न्यूज 

झरी : २४ जून तालुक्यातील दुर्भा येथील रेशन दुकानदाराने बोगस लाभार्थी दाखवित धान्याची उचल करून अफरातफर केली. त्याची माहिती अधिकार कायद्यानुसार रीतसर माहिती सामाजिक कार्यकर्ते बंडू देवळकर यांनी मागितली. त्यामध्ये अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.
जानेवारी ते डिसेंबर २०१८ या कालावधीत दुर्भा येथील रेशन दुकान पाटणला अतिरिक्त दुकान जोडले गेले. रेशनच्या महिला दुकानदार वा. रा. आईटवार यांनी बोगस लाभार्थी दाखवून शासनाकडून नियमित लाभाची उचल करून अपहार केला. या प्रकरणी १८६.८९ क्विटल गहू २३५९.७३ रुपये क्विटलप्रमाणे ४,४१,००९ रुपये आणि १२७.६६ क्विटल तांदूळ ३४४४.१० रुपये क्विंटलप्रमाणे ४,३९,६७३ रुपये असे एकूण ८ लाख ८० हजार ६८२ रुपये वसूल करण्यात यावे. ही रक्कम शासनाच्या खजिन्यात ३० दिवसांत न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
या रेशन दुकानाचा परवाना रद्द करावा व जोडलेले दुकान काढून घेण्यात यावे. लाभार्थीची गैरसोय होणार नाही या दृष्टीने संबंधित रेशन दुकान लगतच्या गावास जोडण्यास यावे, अशाप्रकारचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तहसीलदार झरी जामणी यांना पाठविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा माहिती अधिकार कार्यकर्ते बंडू देवाळकर यांनी अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला होता. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या प्रकरणाकडे राजकीय नेते व तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले होते. तक्रारदारांनी रेशन दुकानदारावर तत्काळ एफआयआर दाखल करण्यात यावा अशी मागणी केली असून अन्यथा न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला आहे.
दुर्भा येथील रेशन दुकानदारास धान्याचा अपहार भोवला दुर्भा येथील रेशन दुकानदारास धान्याचा अपहार भोवला Reviewed by सह्याद्री चौफेर on June 26, 2022 Rating: 5
Powered by Blogger.