चमत्कार अखेर घडलाच; जय सहकार पॅनलची विजयाची परंपरा कायम

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर

वणी : अवघ्या विदर्भासह वणी परिसराचे लक्ष लागून असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सह. पतसंस्थेच्या निवडणुकीचा निकाल समोर आला असून जय सहकारने आपल्या विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. या निवडणुकीत सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवला असून परिवर्तन पॅनलसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत 'परिवर्तन'च्या सर्व उमेदवारांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
परिवर्तन पॅनलपुढे सतराही संचालकाच्या जागा जिंकण्याचे आव्हान असताना, जय सहकारने पुन्हा काँग्रेसच्या पाठिंब्याला तडाखा दिला आहे. कॉंग्रेससह परिवर्तन पॅनल ने पूर्ण ताकत लावून सुद्धा विरोधी पॅनल अॅड देविदास काळे यांच्या अचूक नियोजनामुळे अॅड ढवस यांना विजय मिळवता आला नाही. सहकार च्या अॅड देविदास काळे  यांनी मिळवलेला विजय अन्य साठी आत्मविश्वास वाढवणारा तर पाठिंबा दिलेल्याना आत्मपरीक्षण करण्यासाठी भाग पाडणारा आहे.
पतसंस्थेच्या या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये अॅड देविदास काळे, विवेकानंद आबाराव मांडवकर, सुधीर जनार्दन दामले, हरीशंकर मन्साराम पांडे, लिंगारेड्डी मल्लारेड्डी अंडेलवार, अरविंद वसंतराव ठाकरे, परीक्षित अरुण एकरे, चिंतामण पांडुरंग आगलावे, गोपाळ रघुनाथ पिंपळशेंडे, पुरुषोत्तम हनुमंतू बद्दमवार, घनश्याम वासुदेव निखाडे, सुनील देवराव देठे, सौ छाया अशोक ठाकुरवार, सौ निम्माताई सुनील जीवने, रमेश केशव भोंगळे, सुरेश तानबाजी बरडे, व उदय सदाशिव रायपुरे यांचा समावेश आहे. 
चमत्कार अखेर घडलाच; जय सहकार पॅनलची विजयाची परंपरा कायम चमत्कार अखेर घडलाच; जय सहकार पॅनलची विजयाची परंपरा कायम Reviewed by सह्याद्री चौफेर on June 27, 2022 Rating: 5
Powered by Blogger.