बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर
उदगीर : लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील रामेश्वर सब्बनवाड यांनी एमपीएससी (mpsc) परीक्षेत स्वतःच्या जिद्द चिकाटी मेहनतीच्या जोरावर लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून 202 क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला आहे.
हंडरगुळी गावाचे नाव उज्वल करून तो हंडरगुळी ग्रामीण भागातील पहिला आयएएस होण्याचा मान पटकावला आहे. या उज्वल यशाबद्दल उदगीर तालुक्यात आनंद व्यक्त होत आहे. रामेश्वर सब्बनवाड यांचे प्राथमिक शिक्षण गावातच रामराव पाटील प्राथमिक विद्यालय हंडरगुळी येथे झाले, ६ ते १० शिक्षण लातूर येथील जवाहरलाल नवोदय विद्यालयात झाले. ११-१२ वी चे शिक्षण भारतीय जैन संघटना पुणे येथील विद्यालयात झाले असून, सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पुणे येथील शासकीय महाविद्यालयात पूर्ण केले.
चांगल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना त्यांनी स्वतः शिकवनी घेऊन स्वबळावर स्पर्धा परीक्षा दिली परंतु त्यांना प्रथम त्यात यश आले नाही दुसर्यांदा ध्येय उद्दिष्ट जिद्द चिकाटी अहोरात्र मेहनतीच्या अभ्यासाने त्यांना दुसऱ्यांना यश प्राप्त झाले आहे.
वडिलांचे गावात छोटेसे किराणा दुकान आई वडील व दोन भाऊ असून त्यांना उच्च शिक्षण देण्याचा त्यांचा मानस असून रामेश्वर सब्बनवाड यांनी इतर मागास वर्गात (OBC) प्रवर्गात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल तो मोठा अधिकारी होणार असल्याचा आनंद आई वडील भाऊ व गावातील नागरिकांना होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल गावातील शिक्षणप्रेमी नागरिक ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले असून तालुक्यात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील छोट्या किराणा दुकानदाराचा मुलगा रामेश्वर सब्बनवाड झाला आय ए एस अधिकारी उदगीर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 02, 2022
Rating:
