विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : शहरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आजूबाजूच्या ग्रामीण भागातून शिक्षण घ्यायला येतात,त्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे,पोलिस भरती ची तयारी करणारे विद्यार्थ्यांचे संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, शहरात एकही अभ्यासिका नसल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत होती. त्यामुळे शहरात सुसज्ज अशी अभ्यासिका असावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होती. मात्र यासाठी कोणीही पुढाकार घ्यायला तय्यार नव्हते. परंतु नगरसेवक जितू नगराळे यांनी याबाबत पुढाकार घेतला. त्यांनी शंकर मडावी नगरसेवक यांना सोबतीला घेतले आणि त्यांच्या प्रभागातील खुल्या स्पेस वर मारेगावतील सर्वात मोठे उद्यान बांधायचं निश्चय केला. जेणेकरून प्रभाग क्रमांक १७ मधील लोकांसाठी उपयुक्त पडेल. आणि उद्यानामध्ये एका भागात सुसज्ज असे ग्रंथालय बांधण्याचे ठरविले.
आज मारेगाव शहरात सर्वात मोठे उद्यान आणि ग्रंथालय प्रभाग क्रमांक १७ मध्ये मंजूर करण्यात आले आहे. तसेच संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ग्रंथालयासाठी आणि रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव उद्यानासाठी एकमताने मंजूर करण्यात आल्याने नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांचे विशेष आभार. तसेच यामुळे सर्व समाजात आनंदाचे वातावरण आहे. मारेगाव शहर नेहमीच एकोप्याने राहतात हे यातून दिसून येते. यासाठी जितू नगराळे यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्यांना शंकरराव मडावी यांनी साथ दिली.
पुढील काळातही मारेगाव नगरपंचायतसाठी जास्तीत जास्त निधी आणणार असल्याचे जितू नगराळे यांनी सांगितले.
मारेगाव शहरात होणार सुसज्ज डॉ आंबेडकर अभ्यासिका व छत्रपती शिवाजी महाराज उद्यान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 02, 2022
Rating:
