टॉप बातम्या

पावसाळा तोंडावर, शाळा परिसरात दुर्गंधी पसरण्याची शक्यता

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या फेफरवाडा येथील जिल्हा परिषद शाळा लगत शेणखताचा ढिगारा स्थानिकांकडून साठवल्याने या शाळा परिसरात मोठी दुर्गंधी पसरण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे. यामुळे या अंगणवाडी व शाळेकरू विद्यार्थ्यांना याचा त्रास होईल असे बोलल्या जात आहे.


पावसाळ्याचे दिवस तोंडावर आहे, यातून दुर्धंधी निर्माण होवून सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल. जि प शाळा शेजारी कंपाउंड लगत शेणखत असल्याने या परीसरात अस्वच्छता पसरली असून या साठलेल्या शेणखतामुळे दुर्गंधी निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याची ओरड आहे.


गावातील विद्यार्थ्यांसह लहान बालकांना त्याचा त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे यावर प्रशासनाने त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आहे.
Previous Post Next Post