विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : तालुक्यातील हिवरा (मजरा) विविध कार्यकारी सहकारी संस्थाचा कार्यकाळ सम्पूष्टांत आल्यामुळे सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम पार पडला. या निवडणुक मैदानात शेतकरी समन्वय पॅनल व शेतकरी विकास पॅनल आमने सामने उभे होते. चुरशी च्या सामन्यात शेतकरी समन्वय पॅनलचे १० तर शेतकरी विकास पॅनलचे ३ संचालक विजयी झाले आहे.
तालुक्याचे लक्ष लागलेल्या हिवरा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल दि. २७ मे च्या सायंकाळी सात वाजता जाहिर करण्यात आला. ही निवडणुक अत्यंत चूरशीची झाली. या निवडणुकीत शेतकरी समन्वय पॅनलचे विरोधात शेतकरी एकता पॅनल आमने सामने उभे करण्यात आले होते. दोनही पॅनलसाठी ही निवडणुक अस्तित्वाची मानली जात होती. त्यामुळे या निवडणुकीला परिसरात चांगलाच रंग चढला होता. तालुक्यात पार पडलेल्या आता पर्यंतच्या निवडणुकीचा "धुरळा" काही ठिकाणी अविरोध तर,काही ठिकाणी दोन पॅनल मध्ये टक्कर होऊन एका पॅनल चे संपूर्ण संचालक विजयी,तर दुसऱ्या पॅनलचा धुव्वा उडाल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. मात्र, सोसायटीत अनपेक्षित निकाल लागला आहे. यामध्ये शेतकरी समन्वय पॅनल चे १० संचालक विजयी झाले असून, क्रास वोटिंग मध्ये शेतकरी एकता पैनलचे ३ संचालकानी विजयाची मुसंडी मारली आहे.
शेतकरी समन्वय पॅनल च्या विजयी संचालकामध्ये इतर मागास प्रवर्गातून शरद ताजने, सर्व साधारण गटातून शंकर भोयर, मनीष कापसे, छत्रपती ठावरी, मुरलीधर ताजने, घनश्याम ढवस, बालाजी आस्कर, पंढरी येवले, महिला प्रतिनिधी गटातून सिंधु भोयर, अनुसूचित जाती, जमाती गटातून महादेव कुमरे, या १० संचालकाचा समावेश आहे. तर शेतकरी एकता पॅनलचे विट्ठल ठावरी, चंद्रकला ठावरी, गजानन कपाळे या तीन विजयी संचालकाचा समावेश आहे.
या निवडणुकीत बाबा भोयर, पुरुषोत्तम बुट्टे, जीवन काळे, अनता निब्रड, राजू चाभारे, देवराव आवारी, अरुण आस्कर, नामदेव भोंग, विनोद धोबे, राजु आसकर, रमेश ढोके इत्यादी प्रमुखानी विजयासाठी परिश्रम घेतले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून डी. आर. इंगोले, गणेश डाखरे यांनी काम पाहिले.
शेतकरी समन्वय पॅनलचे दहा संचालक विजयी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 01, 2022
Rating:
