महागाई विरोधात माकप चे वणीत आंदोलन

सह्याद्री | चौफेर न्यूज 

वणी : दि.३१ मे रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने  येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने करित केंद्र सरकार ची महागाई च्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

महागाई देशात सतत नव नवे उच्चांक गाठत असल्याने जनतेचे कंबरडे मोडले आहे. कोट्यवधी लोक दारिद्र्यात ढकलले जात असून, त्यांच्या उपासमारीने तडफड होऊ लागली आहे. तसेच केंद्र सरकारने नोकरी भरती बंद करून खाजगीकरणाचे धोरण स्वीकारल्याने बेरोजगारीने कळस गाठला असल्याने गरिबांच्या दैन्यात वाढ झाली आहे. ह्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधून ताबडतोब महागाई कमी करून सर्व रिक्त पदे भरण्यात यावे ही प्रमुख मागणी घेऊन देशव्यापी आंदोलन करण्यात आले.
मागील वर्षभरात पेट्रोलियम पदार्थाच्या किमती ७० टक्के, भाजीपाल्याच्या २० टक्के, खाद्यतेलाच्या ३३ टक्के, डाळीच्या ८ टक्के वाढल्या आहेत. याकरिता या आंदोलनात १) पेट्रोलियम पदार्थावरील सर्व चार्ज मागे घ्या,
२) सार्वजनिक वितरण व्यवस्थे मार्फत सर्व जीवनावश्यक वस्तू डाळी आणि खाद्यतेलाच्या पुरवठा झाला पाहिजे,
३) आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना दरमहा ७५००/- हस्तांतरित करा,
४) मनरेगा योजनेच्या तरतुदीत वाढ करून शहरी भागाकरिता कायदा लागु करा,
५) बेरोजगारी कमी करण्यासाठी सर्व रिक्त जागा भरा,
६) सर्व बँकेमार्फत शेतकऱ्यांना चालू हंगामासाठी पीक कर्जाचे ताबडतोब वाटप करा आदी व अन्य मागण्या यावेळी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आल्या. 
कॉ. शंकरराव दानव, कॉ. कुमार मोहरमपुरी व कॉ. दिलीप परचाके यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 
यावेळी कॉ. कवडू चांदेकर, गजानन ताकसांडे, मनोज काळे, सुधाकर सोनटक्के, किसन मोहूर्ले, शिवशंकर बांदूरकर, रामभाऊ जीड्डेवार, ऋषी कुळमेथे, नंदू बोबडे आदी उपस्थित होते.
महागाई विरोधात माकप चे वणीत आंदोलन महागाई विरोधात माकप चे वणीत आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on June 01, 2022 Rating: 5
Powered by Blogger.