योगेश मडावी | सह्याद्री चौफेर
झरी : यवतमाळ येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सोमवारी जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. तसेच दुसऱ्या दिवशी सुध्दा अर्धे अधिक कर्मचारी हजर नव्हते त्यामुळे दुसऱ्या दिवशी सुध्दा सरपंच यांचे कडून जिल्हाधिकारी यांना तक्रार देण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी तक्रारीची दखल घेतल्यानंतर प्रभारी आरटीओंनी सर्व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. व सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली.
सोमवारी अहेरअल्ली येथील सरपंच हितेश राऊत यांनी प्रतीकात्मक आंदोलन करीत अधिकाऱ्यांच्या खुर्च्याना हार घातला. नंतर या खुर्च्या जिल्हाधिकारी कार्यालयात नेल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी निवेदन दिले. सरपंच राऊत यांना त्यांची मागणी गांभीर्याने घेण्याची ग्वाही दिली. शिवाय शासकीय अधिकाऱ्यांच्या खुर्च्या भेट म्हणून स्वीकारण्याचे कुठलेही प्रावधान कायद्यात नाही. त्यामुळे या खुर्च्या साभार परिवहन विभागाला परत करण्यासही त्यांनी सांगितले. अखेर सरपंच राऊत यांनी समजूतदारी घेत त्या खुर्च्या साभार स्थानिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पोहोचत्या केल्या.
सोमवारी झालेल्या या आंदोलनाचे मंगळवारी पडसाद आरटीओ कार्यालयात पाहावयास मिळाले. मंगळवारी सुध्दा सकाळी ११ वाजेपर्यंत निम्मे पेक्षा कमी कर्मचारीच हजर होते. दुसऱ्या दिवशी सुध्दा सरपंच यांचे कडून जिल्हाधिकारी यांना तक्रार देण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी तक्रारीची दखल घेतल्यानंतर प्रभारी आरटीओंनी सर्व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. लेटलतिफ अधिकारी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. याशिवाय मंगळवारी कार्यालयात उशिरा पोहोचलेल्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटर वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक , मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावून तीन दिवसात खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. तर सहायक परिवहन अधिकारी दीपक गोपाळे यांनी किरकोळ रजेचा अर्ज २६ मे रोजी आवक केला होता. तो अर्ज परिवहन अधिकाऱ्याकडे ३१ मे रोजी सादर झाला. ही बाब कार्यालयीन शिस्तीला अनुसरून नसल्याचा ठपका ठेवत त्यांनाही शोकॉज नोटीस बजावण्यात आली आहे.
आरटीओ कॅम्प ठेवण्याचे निर्देश :
झरी जामणी या आदिवासीबहुल तालुक्यात आरटीओचा एकही कॅम्प घेतला जात नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलन करण्यात आले होते. अखेर या आंदोलनाला यश मिळाले असून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी २४ जून रोजी झरीजामणी येथे आरटीओ कॅम्प ठेवण्याचे निर्देश दिले आहे. त्याची प्रत सरपंच हितेश राऊत यांना देण्यात आली आहे.
आरटीओंनी घेतली सर्व कर्मचाऱ्यांची झाडाझडती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 01, 2022
Rating:
