मारेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा कायापालट

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : पशुसंवर्धन विभाग, जि.प. यवतमाळ अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ मारेगाव ही जवळपास ६० वर्ष जुनी इमारत आहे.

तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे पशुपालकांची वर्दळ इतर दवाखान्यापेक्षा जास्तीच असते. त्यामुळे येथील खात्याचे नवीन रुजू झालेले डॉ. आकाश राठोड पशुधन विकास अधिकारी गट अ, मारेगाव यांनी स्वतःच्या प्रयत्नशील स्वभावाने व कुठल्याही निधीची वाट न बघता स्वखर्चाने आपली जवाबदारी समजून स्वखर्चाने इमारती चा कायापालट केलेला आहे. सदर कार्यसाठी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ सर (मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यवतमाळ) डॉ. क्रांती काटोले मॅडम (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, यवतमाळ), डॉ. बालाजी जाधव, डॉ. मंदार मराठे यांचे कडून प्रेरणा मिळाल्याचे डॉ. आकाश राठोड यांनी सांगितले.
              (६० वर्ष जुनी इमारतचे छायाचित्र)

सदर ठिकाणी उत्तम पशुवैद्यकीय सेवा व पशुपालकांना मार्गदर्शन मिळत असल्याने मारेगाव परिसरातील शेतकरी बांधवाने डॉ. आकाश राठोड यशस्वी प्रयत्नाबाबत सर्वदूर कौतुक सुमने उधळत आहेत.
मारेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा कायापालट मारेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा कायापालट Reviewed by सह्याद्री चौफेर on June 01, 2022 Rating: 5
Powered by Blogger.