योगेश मडावी | सह्याद्री चौफेर
झरी : तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. कमळवेल्ली येथे झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पॅनलच्या १२ ही उमेदवारांचा दारूण पराभव करीत भारतीय जनता पार्टी पॅनलचा दणदणीत विजय झाला.
या विजयाचे शिल्पकार नरेंद्ररेड्डी बोदकुरवार माजी संचालक य. जि. म. सह. बँक यवतमाळ, वामनराव येलचलवार माजी जि.प. सदस्य यवतमाळ, अशोकरेड्डी बोदकुरवार माजी सभापती कृ.उ.बा.स. मारेगाव, पुष्पाताई रामन्ना चुक्कलवार सरपंच रा. कमळवेल्ली, अशोक पोतराजवार, सचिन दुम्मनवार व किशोर पाईलवार रा. टाकळी, मनोहर खडसे व व्यंकटराव कुळसंगे रा. दाभा, दिलीप पाटील राऊत व गंगाधर राऊत रा.अहेरअल्ली, तुळशीदास पडलवार व कुशकुमार केमेकार रा. वठोली यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली. या निवडणुकीत विजयी झालेले आदिवासी कर्जदार मतदार संघातुन निवडून आलेले मतदार वासुदेव अर्जुन उईके यांना २७५ मते, दत्ता विठ्ठल कुळसंगे २७८, महादेव परसराम कुळसंगे २७३, व्यंकटराव नानाजी कुळसंगे २८२, भिवा किसन गेडाम यांना २४७ मते मिळाले.
बिगर आदिवासी कर्जदार खातेदार मतदार संघातुन निवडून आलेले उमेदवार दिलीप कृष्णा भोयर २७५, श्रीनिवास वामनराव येलचलवार २७३, महिला प्रतिनिधी मतदार संघातुन बेबी प्रभाकर वेट्टी २७७, निर्मला कवडु सिडाम २७९, अनुसुचित जाती/जमाती मतदार संघातुन निवडून आलेले उमेदवार सिताराम पुरुषोत्तम हलवले २८८, इतर मागास प्रवर्ग मतदार संघातुन जगदीश बापुराव टोंगलवार २७७, भ.ज./भ.जा./ वि.मा.प्र. मतदार संघातुन कुशकुमार रामलु केमेकार यांना २८२ मते मिळाले.
या निवडणुकीच्या निकालावर संपूर्ण झरी तालुक्यातील जनतेचे विशेष लक्ष होते. शेतकरी विकास पॅनलचे (भाजपा) १२ ही उमेदवार विजयी झाल्यामुळे सर्व झरी तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने गुलाल उधळून आतिशबाजी विजयी उत्सव साजरा करण्यात आला.
कमळवेल्ली सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 02, 2022
Rating:
