विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : सध्या खरीप हंगाम सुरु झाला असून त्यातच संपूर्ण वणी मतदारसंघात विविध सहकारी सोसायटी च्या निवडणुका होऊ घातल्या असताना त्या ग्रामस्तरावर पार पडत आहे. अशा अवस्थेत खरीप पिक कर्ज वाटपाला विलंब होऊ नये म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यां वतीने वनोजा देवी येथे असाच "कर्ज वाटप कार्यक्रम व मार्गदर्शन" चा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे संजय देरकर उपाध्यक्ष जिल्ह मध्यवर्ती बँक मारेगाव हे उपस्थित होते. सोबत मंचावर नवनिर्वाचित अध्यक्ष गोवर्धन टोंगे, प्रमुख पाहुणे म्हणून डिमनताई टोंगे, जनार्धन गाडगे उपसरपंच, अरुण चोपनी पुणे, प्रवीण खानझोडे, भोगेकर मॅडम व नवनियुक्त संचालक व संचालिका, गावातील महिला बचत गट व गावातील नागरिक उपस्थित होते.
या प्रसंगी सर्व महिला व नवनियुक्त संचालक मंडळानी संजय देरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला आहे. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात बँके च्या विविध योजना ची सविस्तर माहिती दिली. शेतकरी बांधवानी फक्त पिक कर्जावर अवलंबुन व राहता इतरीही योजना चा लाभ घेतला पाहिजे व शेतकरी बांधवंनी आपलं उद्धार केला पाहिजे, मी माझे कर्तव्य पार पाडीत आहो. आपण सभासदांनी मला निवडून पाठविले त्यामुळे मी आपल्या समक्ष ह्या माहिती पोचवीत आहे,हे माझे कार्य आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वनोजा देवी येथे खरीप पीक "कर्ज" वाटप
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 03, 2022
Rating:
