टॉप बातम्या

मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यात दारव्हा तालुक्यातील बळीराजा व्यस्त

चेतन पवार | सह्याद्री चौफेर

दारव्हा : येणाऱ्या काही दिवसात पावसाळा सुरु होईल या शक्यतेने शेतीतील मशागतीची तसेच जनावरांसाठी चारा साठवणीच्या कामात तालुक्यातील बळीराजा व्यस्त असल्याचे चित्र सद्या दिसून येत आहे साधारणत जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मान्सूनचे आगमन होईल या पावसाच्या शक्यतेवर भोकर तालुक्यातील बळीराजा पीक पेरणीसाठी शेत जमीनीची मशागत करून ठेवतो यामध्ये नांगरने निट निटकेपणा करणे, औत धरणे, जमिनीचे सपाटीकरण करणे, बांध बदिस्ती करून घेणे, शेतातील तण काढणे इत्यादी मान्सूनपूर्व कामे शेतकरी उरकून घेतात पिकासाठी जमीनीची तयारी करावी लागत असल्याचे पावसाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्याची  साठवणूक करून चारा झाकून ठेवला आहे.कामांसाठी शेत मजुरांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते; मात्र सध्या परिसरातील शेतकरी ऐन पावसाळ्यात जनावरांना चारा मिळणे कठीण होवून जाते. त्यासाठी जनावरांच्या चाऱ्याची सोय करून ठेवावी लागत असते. त्यामुळे अनेक शेतकरी चाऱ्याची साठवणूक करण्याच्या कामात तसेच तो चारा पावसामुळे खराब होवू नये म्हणून प्लास्टिकचे मोठे कागद टाकून झाकून ठेवण्याच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दारव्हा तालुक्यात ग्रामीण भागात दिसून येत आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर पेरणीसाठी धावपळ होवू नये म्हणून त्यासाठी आवश्यक बी - बियाणे तसेच खते घेण्यासाठी शेतकरी बी-बियाणे विक्रीच्या दुकानात गर्दी करत आहेत.
Previous Post Next Post