कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाने आपला पाचवा अहवाल प्रसिद्ध केला. यासाठी आरोग्य मंत्रालयाने भारतातील सर्व राज्यात सर्वेक्षण केलं आहे.
सर्वेक्षणानुसार भारतात आता प्रत्येक महिलेला सरासरी 2 मुलं आहेत. गेल्या सर्वेक्षणा पेक्षा आता घट झाली आहे तसेच देशातील तरूण पिढीला लवकर मुलं नाही पाहिजे असं दिसतंय.
आता भारतात गर्भनिरोधकांचा वापर वाढल्याचं दिसून आले. 2015 मध्ये 54 टक्के लोकांनी गर्भनिरोधकांचा वापर करत होते, तर 67 टक्के लोक आता गर्भनिरोधक पद्धत वापरत आहेत.
तसेच आता दवाखान्यात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी 60 टक्के स्त्रिया गरोदर राहिल्यानंतर,पहिल्या तीन महिन्यांत क्लिनिकमध्ये जात होत्या,
तर आता हे प्रमाण वाढले आता 70 टक्के महिला क्लिनिकमध्ये जातात. सर्वात महत्वाचे म्हणजे सध्या भारतात 89 टक्के प्रसूती रुग्णालयात होत आहेत,असे देखील अहवालातून स्पस्ट झाले.
गर्भनिरोधकांच्या वापरात मोठी वाढ - देशातील तरूण पिढीला का नकोयत मुलं
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 07, 2022
Rating:
