नळाच्या पाण्याचा अपव्यय; मच्छिन्द्र्यात वाहतो गल्लोगल्ली पूर

सह्याद्री | चौफेर न्यूज 

मारेगाव : पंचायत समिती मारेगाव अंतर्गत येत असलेल्या मच्छिन्द्रा येथे नळाच्या पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे. का हे रस्त्यावरील पाणी बंद होत नाही, का मुद्दाम अशी वागतात लोकं, का स्वतः च्या आरोग्याशी खेळ खेळतात ग्रामस्थ, यांना बोलून सांगून काहीही उपयोग नाही किंबहुना काहीच फरक कसा पडत नाही. अशा अनेक प्रश्नानी हे विवादीत पाणी निरंतर वाहतेय.
  
ऐन मोक्याच्या ठिकाणी गाडण (चिखल) चे साम्राज्य निर्माण झाले असून, गल्लोगल्ली पाणी वाहत असल्याने भर उन्हाळ्याच्या दिवसात पावसाळा सुरु असल्याचे दिसून येते. ग्रामपंचायत प्रशासन पाणी नियोजन यासाठी पुढाकार घेत असला तरी ग्रामस्थांमध्ये कमालीचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे. नळ योजनेचे पाणी शेतकरी शेत मजुरांचे कामाच्या दृष्टीने वेळ वाचवत असले तरी आरोग्याच्या दृष्टीने रस्त्यावरील सांडपाणी अतिशय धोकादायक असून अपघातास निमंत्रण देणारे आहे. किंबहुना अनेकदा छोटेमोठे अपघात सुद्धा घडले आहे. परिणामी प्रत्येकाने आपापली नैतिक जबाबदारी समजून घेतली तर नळाचे पाणी रस्त्यावर वाहणार नाहीत. परंतु असे नळ धारकांच्या चुकूनही आचरणात येणार नाही असे मत व्यक्त होतात.
या सांडपाण्यामुळे नाहक त्रास सहन करणाऱ्यांकडून ही नळ योजनाच बंद करावी अशी संतापजनक प्रतिक्रिया देत रोज रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याला बघून नाही नाही ते बोलून जातात तरी देखील रस्त्यावर आपल्या नळाचे वाहणारे पाणी बंद करावे याबाबत अजूनही कोणाला घाम फुटला नाही.
गावात पाण्याच्या अपव्यय सुरूच आहे. परिणामी आरोग्याचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता वाढली असून रस्त्यावर वाहणारे पाणी बंद करण्यासाठी कोण पुढाकार घेणार हा चिंतनाचा विषय झाला आहे.


नळाच्या पाण्याचा अपव्यय; मच्छिन्द्र्यात वाहतो गल्लोगल्ली पूर नळाच्या पाण्याचा अपव्यय; मच्छिन्द्र्यात वाहतो गल्लोगल्ली पूर Reviewed by सह्याद्री चौफेर on May 07, 2022 Rating: 5
Powered by Blogger.