एवढ्यात प्रमाण वाढलं एक्सीडेन्ट होयका का होय...

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : मागील काही दिवसापासून अपघाताच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येते. एवढ्यात एक्सीडेन्ट भाय होत आहे, सांभाळून वागण्याची गरज आहे असं असलं तरी कोणीही वाहतूक नियमाचं पालन करताना दिसून येत नाही.

आज मोठ्यापासून तर लहान्यांची बाईक चालवण्याचे ट्रेंड बदलले म्हणायचे. वेगाने बाईक चालवणे, मद्य ढोसून मोटारसायकल हाकलणे, स्टाईल मारत गाडी चालविणे हे कित्येकदा जीवावर बितलं असताना देखील बाईक,चारचाकी वाहन असो वा तीन चाकी वाहन वेगाने चालवण्याचा नाद आणि होणारे अपघात थांबणार नाही. असे चर्चील्या जात असतांना वणी नांदेपेरा मार्गांवर अगदी लायन्स कॉन्व्हेंट जवळ दोन मोटारसायकल भिडल्याने दोन गंभीर जखमी झाले असून त्यांना चंद्रपूरला रवाना करण्यात आले. जखमी झालेले दोघेही वरोरा येथील रहिवाशी आहे. वामन गणपत रोडे (८०) व चंद्रशेखर गौरकार (४५) रा वरोरा असे अपघातात जखमीचे नाव असून हे दोघेही मोटारसायकल येत होते. दुपारी चार वाजताच्या सुमारास वणीतील निखिल पिदूरकर (२५) व अंकित धानोरकर (२४) हे आपल्या दुचाकीने नांदेपेरा बायपास कडे जात होते. दरम्यान रेल्वे गेटसमोर दोन्ही मोटारसायकल एकमेकांना भीडल्या यात वरोरा येथील दोन्ही इसमांच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर वणीतील दोन्ही तरुण किरकोळ जखमी झाले. ही घटना काल दिनांक ६ मे रोजी घडली.

यापेक्षा ही मन सुन्न करणारी शिरपूर स्टेशन च्या हद्दीतील बुधवारला पुनवट जवळ घडलेली घटना. या घटने दरम्यान तोबा गर्दी उसळली होती. महामार्गांवरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्र एम एच ३१ एफ सी ६३९९ या ट्रक चालकाने अनियंत्रितपणे वाहन चालवून रस्त्याची डागडुग्गी करणाऱ्या पाच मजुरांना चिरडले. यात राजू मिलमिले (२७) रा कोठोडा, धर्माजी भटवलकर (६५)रा बेलोरा अशी मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी मृतकांची नावे आहे. तर सतीश गेडाम (३५) रा बेलोरा, पांडुरंग अवताडे (३०) रा कोठोडा, सुरेश जुनघरी (४०) रा बेलोरा हे गंभीर जखमी झाले होते. ही घटना पाच वाजताच्या दरम्यान घडली. निष्काळजीपणाने व भरधाव वाहन चालवून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा बळी गेला तर तीन गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटनेची चर्चा असताना आज पुन्हा बामणी फाटा येथे "एक्सीडेन्ट" झाल्याचे माहिती समोर आली आहे. आटोची मोटारसायकलला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. आज (ता.७) मे रोज शनिवारला १ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार बजाज आटो क्र. एमएच २७ ए सी ८८५६ च्या चालकाने दारू ढोसून निष्काळजीपणाने आटो चालवून मोटारसायकल ला जोरदार धडक दिल्याने भरधाव वेगाने धडक देणारा आटो रस्त्यावर पलटी झाला. यात दुचाकीस्वार संदीप जुनघरी (३५) रा वनोजा देवी ता. मारेगाव याच्या पाठीत गंभीर दुखापत झाली. तर आटो चालकाला किरकोळ इजा झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
एवढ्यात एक्सीडेन्ट भाय होताय म्हणून चर्चा ऐकायला मिळत असतांना बुधवार बाजार च्या सायंकाळी जवळपास साडे सात वाजताच्या दरम्यान, मार्डी नांदेपेरा मार्गांवर एका पैदलचारीला मद्यपी दुचाकीस्वाराने उडवल्याचे ऐकायला मिळाले. अशी चर्चा ऐकण्यात आहे. परंतु अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

एवढ्यात प्रमाण वाढलं एक्सीडेन्ट होयका का होय... एवढ्यात प्रमाण वाढलं एक्सीडेन्ट होयका का होय... Reviewed by सह्याद्री चौफेर on May 07, 2022 Rating: 5
Powered by Blogger.