वनोजा देवी येथे ग्रामजयंती साजरी करण्यात आली

सह्याद्री | चौफेर न्यूज 

मारेगाव : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्राम जयंती वनोजा देवी, येथे शुक्रवार दिनांक 29/4/2022 रोजी साजरी करण्यात आली. या वेळी मा. प्रा. डॉ. गजानन अगळते सर ग्रामगिता व्याख्याते, सुनील देवाळकर, सोनटक्केजी सेवधिकारी, डाखरे, सप्रे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ गीता धांडे, प्रमुख पाहुणे दरेकरताई, ग्रामगिताचार्य, कोरडेजी, ठेंगणे, राजूरकर, उरकुडे, सिडामजी, पेचेजी, ह भ प श्री हरिदासजी महाराज आळंदीकर, यांच्या उपस्थितीत आयोजित कार्य उत्सहात साजरा पार पडला.

"स्वच्छ करूया गाव सगळे
या जनी हो क्षणी"
या भजनाला आत्मसात करून गावात ग्रामस्वच्छता राबविण्यात आली. गावातील पोलीस पाटील श्री. ढवस यांचे हस्ते घटस्थापना. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ वनोजा,यांचा राष्ट्रसंताच्या भजनाचा कार्यक्रम सादर झाला. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे देशात सर्व कार्यक्रम होऊ शकले नाही. मात्र, जसं जसे कोरोनाचे संकट ओसरू लागले तसे शासनाने शिथिल दिल्याने जनतेनी मोकळा श्वास घेत सण उत्सव कार्यक्रम साजरे होऊ लागले असतांना वनोजा येथे तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने प्रभात फेरी, सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान, भजन अशा विविध कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमला यशस्वी करण्यासाठी प्रशांत भंडारी, विठ्ठल पिदूरकर, पंढरी धांडे, क्षीरसागर, पांडुरंग देऊळकर, गणपत घाटे, राजू देवाळकर, गुलाब बरडे, अनंता घोटकर, दिलीप येसेकर, विठ्ठल घाटे, रवींद्र धांडे, रामभाऊ पिदूरकर, सुनील पुनवटकर, शंकर टोंगे, हर्षद देवाळकर, राजू दीक्षित, संदीप मडावी, गंगाधर धोटे, महाकुलकर व भजनी मंडळी यासह शाळकरी मुलं, महिला व पुरुष जेष्ठ नागरिकांनी दोन दिवशीय होणाऱ्या
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामजयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली असे , प्रशांत भंडारी यांनी माहिती दिली.

वनोजा देवी येथे ग्रामजयंती साजरी करण्यात आली वनोजा देवी येथे ग्रामजयंती साजरी करण्यात आली Reviewed by सह्याद्री चौफेर on May 07, 2022 Rating: 5
Powered by Blogger.