आरसीसीपीएल कंपनीच्या परिसरात सापडला मानवी मृतदेहाचा सांगाळा


योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : मुकूटबन येथील आरसीसीपीएल अँड एमपी बिर्ला ग्रुप सिमेंट कंपनी मध्ये ता. 4 मे ला दुपारी तीनच्या दरम्यान कंपनीच्या कामासाठी जेसिबिने वाळू भरत असताना त्या रेतीच्या ढिगांमध्ये अज्ञात व्यक्तीचे अंगावर कपडे नसलेले एका कपड्याचे गाठोड्यात बांधून व वरून नायलॉन दोरीने बांधलेल्या स्थितीत मानवी हाडाचे सांगाडे आढळले. त्यामुळे कंपनी परिसरात खळबळ उडाली असून कंपनीची काऱ्यशैली संशयाच्या भोवऱ्यात आहे.

वाळूत मानवी हाडाचे सांगाडे आढळले त्यावरून कंपनीतील व्यवस्थापकांनी पोलिसांना व नायब तहसीलदार यांना पाचारण केले. पोलिसांनी कपडे बांधून असलेल्या अज्ञात व्यक्तीचा सांगाडा ताब्यात घेऊन त्याला खड्ड्यात पुरले. काही हाडाचे अवशेष डीएनए चाचणीसाठी अमरावती येथे पाठवणार त्यावरून त्याचे वय, पुरुष की महिला हे कळेल. व सदर व्यक्ती कंपनीमधील कामगार आहे की चंद्रपूर येथून वाळूच्या टिप्पर मध्ये वाळू सोबत आले की काय याची चौकशी होणार असल्याची माहिती ठाणेदार यांनी सांगितली.
मुकूटबन येथील पत्रकारांना याविषयी दुपारी चार वाजता माहिती मिळाली असता तीन पत्रकार आरसीसीपीएल कंपनीच्या गेट जवळ गेले असता कंपनीतील सुरक्षा गार्ड नी त्यांना आत मध्ये जाऊ दिले नाही. पत्रकारांनी कंपनीचे व्यवस्थापक (एच आर) जयंत व्यास यांना मोबाईल वर कॉल केले असता त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही. सुरक्षा गार्ड यांनी पत्रकारांना सांगितले की कंपनीचे एच आर जयंत व्यास हे गेट जवळ थोड्याच वेळात येत आहे. त्यानंतर आपण त्यांचेसोबत चर्चा करून मृतदेहाजवळ जा असे सांगितले. पंधरा मिनिटांनंतर जयंत व्यास गेट जवळ आले त्यानंतर तिन्ही पत्रकार जयंत व्यास सोबत गेट जवळ असलेल्या कार्यालयात चर्चेसाठी बसले चर्चेत कंपनीच्या म्हणण्यानुसार हे सांगाडे चंद्रपूर येथून वाळू आणल्या गेली त्या वाळूत हे मृतदेह आले असावे असा कयास आहे. कंपनीत वाळूचे काम असल्यामुळे या वाळूचा उपसा जेसीबी व्दारे करण्यात आला. त्यात या मृतदेहाचा सांगाडा सापडला असे सांगितले. चर्चेअंती तिन्ही पत्रकारांनी अज्ञात व्यक्तीचे प्रेत ज्या ठिकाणी मिळाले त्या घटना स्थळावर जाण्यासाठी विनंती केली. परंतु कंपनीचे व्यवस्थापक व्यास यांनी उडवाउडवीची उत्तर देत तिथे जाण्यासाठी टाळाटाळ केली. यावरून पत्रकारात आणखी संशय बळावला असून कंपनीची भूमिका संशयास्पद आहे.
पोलीस योग्य तपास करतील काय 
पत्रकार कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटले असता कंपनीच्या अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे, पत्रकारांना मृताचे गाठोडे न दाखवणे यावरून या मृताचा घातपात करून वाळूच्या ढिगाऱ्यात हे मृतदेह दाबण्यात आले असावे. किंवा चंद्रपूर परिसरात या व्यक्तीचा घातपात करून हे प्रेत पांढऱ्या कपड्यात किंवा प्लास्टिक मध्ये गुंडाळून चंद्रपूर येथील वाळूच्या घाटात पुरले असावे असा अंदाज आहे. तेथून हे प्रेत मुकूटबन येथे वाळूच्या घाटातून ट्रकच्या माध्यमातून कंपनीत आले असावे असा अंदाज आहे. मुकूटबन पोलिसांनी योग्य तपास केल्यास यात काय गौडबंगाल आहे हे उघडकीस येईल.
आरसीसीपीएल कंपनीच्या परिसरात सापडला मानवी मृतदेहाचा सांगाळा आरसीसीपीएल कंपनीच्या परिसरात सापडला मानवी मृतदेहाचा सांगाळा Reviewed by सह्याद्री चौफेर on May 06, 2022 Rating: 5
Powered by Blogger.