चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांना महामंडळ एसटी बस सेवेची नितांत आवश्यकता असताना बस डेपोची मात्र या महत्त्वाच्या विषयाकडे डोळे झाक घेताना दिसत आहे.
मागील अनेक महिन्यातून खाजगी वाहनाद्वरे शहराकडील प्रवाशांच्या खिशाला मोठा अतिरिक्त भार सोपावा लागत आहे. राजमार्ग महामार्ग यावर एसटी सेवा सुसाट धावत आहेत. मात्र, ग्रामीण भागावर अन्यायच होतो. असे का? असे अनेक प्रकारचे प्रश्न प्रवाशी दिसून येत आहे. ग्रामीण भागातील मोहजाबंदी, मांडवा जवळा, कुन्हा, भरजहागिर मार्गे एसटी बस फेरी गावांतील नागरिकांसह ज्येष्ठ नागरिक नोकरवर्ग शालेय विद्यार्थी वय वृध्द आगारी इत्यादी कुठल्याही कामांसाठी जावे लागते. परंतु आधी कोरोना विष्यानुतील लॉकडाऊनमुळे नंतर एसटी कर्मचारी वर्गाची विलगीकरण संपामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महामंडळाची एसटीची सेवा मात्र बंदच. ग्रामीण भागातच असे का? शहराकडे एसटीची धाव मात्र जोरात आहे.
प्रत्येक अर्ध्या तासात बस फेऱ्या धावताना दिसत आहेत, परंतु सर्व दूर पल्याच्या गाड्या रोडवर दिसत आहेत. परंतु तरीपण ग्रामीण भागातील फेरी बंद आहे. असे नागरिकांकडून स्वतः व्यक्त करण्यात येत आहे. तरी ग्रामीण भागातील बसफेरी पुर्वी प्रमाणे ह्या मार्गी सुरु करण्यात यावी अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिक करीत आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी सेवा अद्यापही बंदच..?
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 06, 2022
Rating:
