शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी इतर व्यवसायांप्रमाणे सुविधा द्या !

चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : तालुक्यातील शेतकरी वर्गाकडे शासनकर्त्यांचे होणारे दुर्लक्ष, सततचे दुष्काळ, नापिकी, शेतीमालाचे कवडीमोल भाव, वाढती महागाई व कर्जबाजारीपणामुळे शेती व्यवसाय व शेतकरी दोघेही अडचणीत सापडले आहेत. ही परीस्थिती आणखी काही काळ अशीच राहिली तर अतिप्राचिन असा शेतीव्यवसाय व शेतकरी नामशेष झाल्यास वावगे ठरु नये. जगातील सर्वच उद्योगधंदे व व्यवसायाची जननी म्हणून शेती व्यवसायाची ख्याती आहे.
      
जवळपास व्यवसायांना लागणारी साधनसामुग्री व उर्जा पुरविण्याचे काम शेती व्यवसाय व शेतकरी करीत आहे मात्र आजमितीस शेती व्यवसाय व इतर उद्योगधंदे आदींना चालना देतांना शासनकर्ते दुजाभाव करीत आहेत. त्यामुळे ज्या अद्य व्यवसाय सातत्याने आतंबड्याचा होत जावून जगाचा पोशिंदा शेतकरी आर्थिक विवंचनेला कंटाळून स्वाभिमानापोटी आत्महत्येसारखा टोकाचे पाऊल उचलत आहे. हे वास्तव आज शासनाने बँका व शासनाचे विविध विभाग, विविध उद्योगधंद्यांना विविध सवलती पुरवितात. 
          
मात्र, त्या उलट सर्वच उद्योग शेतकऱ्यांकडे हवा तसा वेळ व सुविधा पुरविण्यास कुणाकडेच वेळ नाही. इतर उद्योगधंदे व्यवसाय आदींना बँका हवे तेवढे कर्ज बिना विलंब देते. शासनसुध्दा विनाविलंब अर्थसहाय्य देते. २४ तास विज, पाण्याची सोय, दळवणवळणासाठी रस्ते व वाहतुकीची साधने उपलब्ध करुन देते तर या उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाचे भाव ठरविण्याची मुभासुध्दा मिळते.
       
याउलट शेती व्यवसायासाठी तुटपुंजे बँक पिककर्ज देतांनासुध्दा बँका शेतकऱ्यांच्या प्रकरणात अनेक त्रुट्या काढते. दिवसाकाठी चार ते पाच तास विजेची उपलब्धता, सिंचनाच्या तुटपुंज्या सोयी शेतीपर्यंत जाण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ते नाही. मात्र मोठा उत्पादन खर्च व त्रास सोसून उत्पादित केलेल्या शेतीमालाचे भाव मात्र त्रयस्थांकडून ठरविल्या जात असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.
शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी इतर व्यवसायांप्रमाणे सुविधा द्या ! शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी इतर व्यवसायांप्रमाणे सुविधा द्या ! Reviewed by सह्याद्री चौफेर on May 06, 2022 Rating: 5
Powered by Blogger.