राम शेवाळकर परीसरच्या हद्दीत एकावर प्राणघातक हल्ला करून त्यांला गंभीर जखमी केले..

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : शहरातील राम शेवाळकर परीसराच्या हद्दीत एकावर प्राणघातक हल्ला करून त्यांला गंभीर जखमी केले. ही घटना काल (ता.4) रोज बुधवारी दहा ला सायंकाळी घडली.

हरीष उर्फ ठिका संजय रायपुरे (19) असे हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून काल रात्री दहा च्या सुमारास झुंड बनून मोटरबाइकने आलेल्या राम शेवाळकर परीसरात मारेकऱ्यांनी साथीदारांसह धडकले. हरीष यास शिवागीळ करून लाथा बुक्क्याने व रॉडने हाता पायावर, डोक्यावर मारहाण केली. अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे ठिका संजय रायपुरे जखमी अवस्थेत होता. दरम्यान, दामले फैलात एकच धावपळ उडाली. घटनेनंतर लगेच त्याला ताबडतोब उपचारसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
या गुन्ह्यातील संशयितांची नावे पोलिसांनी निष्पन्न केली असून, त्याचा शोध सुरू आहे.  



राम शेवाळकर परीसरच्या हद्दीत एकावर प्राणघातक हल्ला करून त्यांला गंभीर जखमी केले.. राम शेवाळकर परीसरच्या हद्दीत एकावर प्राणघातक हल्ला करून त्यांला गंभीर जखमी केले.. Reviewed by सह्याद्री चौफेर on May 05, 2022 Rating: 5
Powered by Blogger.