निष्काळजी तलाठ्याकडून निराधारांची हेळसांड थांबवा - मंगलाताई ठक यांची मागणी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

हिंगणघाट : शासनाच्या निराधारने जेष्ठ नागरिकांना जगण्याची उमीद असून म्हाताऱ्या वयात एक आधारवड आहे. कमवणारी, मिरवणारी पोरं आपल्या आईवडिलांना मारझोड करतात ह्या धाकाने कित्येकांनी आपलं घर दार सोडून कुठेतरी एका कोपऱ्यात जगणं पसंत केले. मात्र, त्याही जगण्याला आधार असेल तर एकमेव शासनाचा मिळणारा "निराधार". परंतु काही तलाठी म्हाताऱ्यांना बोलावून आपण स्वतः मात्र, कार्यालयाला किंबहुना बोलावलेल्या ठिकाणी गैरहजर राहत असल्याने अनेकांना निराधारापासून मुकावे लागेल की काय? असा सवाल जेष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मंगलाताई ठक यांनी उपस्थित केला आहे.

आज दुपारी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात निराधारांना हयातीचे प्रमाणपत्र सोबतच 21 हजार रुपयाचा उत्पन्नाचा दाखला हा निराधारांना वेळेवर मिळत नसल्याने त्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या पटवाऱ्यांनची हकालपट्टी करून प्रामाणिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून भर उन्हात  होणारी निराधारांची हेळसांड थांबवावी व शासन नियमावली वेळेतच प्रमाणपत्र दाखले लाभार्थ्यांना द्यावे, ज्यामुळे त्यांची परवड होणार नाही अशी मागणी दिलेल्या निवेदनातून लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे. तसेच जर एखाद्या अधिकाऱ्याच्या हातून निराधारांचा महिना बंद पडला तर त्या बेजबाबदार अधिकाऱ्याकडून निराधार वसुल करावी असा इशाराही यावेळी देण्यात आला. 

निवेदन देताना तालुक्यातील असंख्य जेष्ठ नागरिक महिला यावेळी उपस्थित होत्या. 



 
निष्काळजी तलाठ्याकडून निराधारांची हेळसांड थांबवा - मंगलाताई ठक यांची मागणी निष्काळजी तलाठ्याकडून निराधारांची हेळसांड थांबवा - मंगलाताई ठक यांची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on May 05, 2022 Rating: 5
Powered by Blogger.