चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : अखिल भारतीय ग्राहक पंचायत दारव्हा तालुका शाखे तर्फ शेतकरी ग्राहक प्रबोधन दि. ६ मे २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता तालुक्यातील राजीव नगर, बोरी चंद्रशेखर येथील नाम साधना मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष निवृत्त जिल्हा न्यायाधीश नंदकुमारजी वाघमारे हे शेतकरी ग्राहकांना त्यांच्या हक्का संबंधात मार्गदर्शन करतील. अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे मेळाव्याचे अध्यक्ष असतील. ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक हितेश सेठ, सचिव डॉक्टर केशव चेटुले व तालुका अध्यक्ष प्राचार्य राजेंद्र ठाकूर अन्य पदाधिकारीठाणे उपस्थित राहतील.
मेळाव्यात ग्राहक प्रबोधन कायदा २०१९ मधील महत्वपूर्ण तरतुदाबाबत सुध्दा मार्गदर्शन करण्यात न्यायालयाच्या येऊन ग्राहक कार्यपद्धती संदर्भातही उपस्थित ग्राहकांना माहिती देण्यात येईल. ग्रामीण भागातील ग्राहकांवर विशेषतः शेतकरी ग्राहकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच सर्व सामान्य ग्राहकांना आपल्या हक्का संदर्भात माहिती देण्यासाठी यवतमाळ जिल्हा ग्राहक पंचायत तर्फे जिल्ह्यात सर्व तालुक्यात शेतकरी ग्राहक मेळावा आयोजित करण्यात येणार असून त्याची सुरुवात बोरी चंद्रशेखर येथील मेळाव्याने होणार असल्याची माहिती ग्राहक पंचायतचे बोरी शाखाध्यक्ष तथा मेळाव्याचे संयोजक प्रमोद बाजोरिया यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांसोबत अन्य सर्वसामान्य ग्राहकांनी सुध्दा ग्राहक मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्राहक पंचायत तर्फे करण्यात आले आहे.
बोरी चंद्रशेखर येथे शेतकरी ग्राहक मेळाव्याचे आयोजन..
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 05, 2022
Rating:
