चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : शहरासह तालुक्यात तापमानात वाढ होत असल्याने रस्त्यावर दुपारच्या सुमारास शुकशुकाट दिसून येत आहे. त्यामुळे बाजारपेठेवरही याचा परिणाम दिसून येत आहे. परंतु उन्हाळ्यात नागरिकांची मागणी शितपेयांना जास्त प्रमाणात वाढली असून, शितपेयांना एक प्रकारे अच्छे दिन आल्याचेच दिसून येत आहे. यामुळे शितपेय व्यापाऱ्यांची चांदीच चांदी होत असल्याचे जरी दिसून येत असले तरी मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाची शितपेयांच्या दुकानावर नजर असणे आवश्यक आहे.
शहरासह तालुक्या तापमान दिवसेंदिवस उग्ररुप धारण करीत असून ४१ अंश सेल्सी असच्या वर तापमान जात आहे. नागरिक दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे टाळत आहेत. उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी नागरिक चष्मा, हातरुमाल यासह आदि साहित्य खरेदी करीत आहेत. त्यातच उन्हापासून गारवा निर्माण व्हावा यासाठी थंड शितपेयांची दुकाने जागोजागी थाटली आहे.
यामुळे नागरिक जास्त पसंती थंड शितपेयांना देत असून, लस्सी, ज्यूस, ऊसाचा रस, कोल्ड्रींक अशा थंड शितपेयांना जणू काही एकप्रकारचे अच्छे दिन आल्याचेच दिसून येत आहे. मात्र, याचे भाव देखील अधिक असल्याचे बोलल्या जात आहे.
उन्हाच्या कडाक्याने शितपेयांना आले भाव
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 05, 2022
Rating:
