बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर
उदगीर : येथील आयोजित 95 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनात केंद्रीय प्राथमिक शाळा गौंडगाव येथे प्राथमिक पदवीधर म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती वर्षा करंजे लिखित 'ओंजळ प्राजक्ताची' कवितासंग्रहाचे प्रसिध्द साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
व्यासपीठावर श्रीपाल सबनीस,कवियत्री वर्षा करंजे,श्रीमती अदिती टाकेकर,डाॅ.बालाजी संमुखराव व साहित्यिक उपस्थित होते.यावेळी अनेक रसिक उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत 'ओंजळ प्राजक्ताची 'कवितासंग्रहांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
कवितासंग्रह प्रकाशित झाल्यामुळे देवणी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव बोईनवाड,शिक्षणविस्तारअधिकारी सुर्यकांत येडले,केंद्रप्रमुख केशव नरवटे,मु.अ.शिवाजी इंचुरे,जिल्हाध्यक्ष किशनराव बिरादार,तालुकाध्यक्ष शिवाजी टिळे व तालुक्यातील शिक्षक बांधवांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
'ओंजळ प्राजक्ताची' कवितासंग्रह पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 02, 2022
Rating:
