महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त भव्य कामगार मेळावा


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : धडक कामगार युनियन महासंघ आणि दैनिक मुंबई मित्र व वृत्त मित्र यांचे संपादक/संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेता अभिजीत राणे व त्यांच्या समुहाने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून कामगार संघटना, वृत्तपत्र समुह,सामाजिक कार्यकर्ते पत्रकार,यांचा भव्य-दीव्य नागरिक सत्कार गोरेगाव,आरे मुंबई येथे ठेवण्यात आला होता.

त्या निमित्ताने संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुहास राणे (संपादक साप्ताहिक प्रजेचे शिवराज्य, मासिक विर जनसेना, संभाजी ब्रिगेड कामगार संघटना, उपाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड चित्रपट आघाडी,उपाध्यक्ष) यांनी सामाजिककार्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना "महाराष्ट्र मित्र २०२२" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त भव्य कामगार मेळावा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त भव्य कामगार मेळावा Reviewed by सह्याद्री चौफेर on May 01, 2022 Rating: 5
Powered by Blogger.