आद्य कवियत्री सावित्रीमाई फुले राष्ट्रीय पुरस्काराने सौ. विमलताई माळी व सौ. शांताबाई क्षीरसागर सन्मानित !


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : आद्य कवियत्री सावित्रीमाई फुले राष्ट्रीय पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील आधुनिक काळातील बहिणाबाई सौ. विमलताई माळी, अनगर व सौ . शांताबाई क्षीरसागर जेष्ठ कवियत्री यांना अखिल भारतीय माळी महासंघ आयोजित राज्यस्तरीय सर्व शाखीय परिचय मेळावा, अरण येथे सन्मानपत्र, विजयचिन्ह (पारितोषिक) पुष्पगुच्छ अखिल भारतीय माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. रोहिणीताई पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी सौ. विमलताई माळी* या शेतकरी कुटुंबातील इ.२ री शिकल्या असून त्यांच्या ६०० पेक्ष्या जास्त कविता तोंडपाठ आहेत. त्यांचा महाराष्ट्रमध्ये अनेक कवी संमेलन सामाजिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग असतो. त्यांना शासकीय स्तरावर महिला दिनानिमित्त कवी संमेलनात सहभागी केले जाते. अशा या कवियत्रीच्या कविता शासनाने प्रकाशित करून त्यांचा उचित सन्मान करावा. अशी मागणी लिंगे यांनी केली. सौ. शांताबाई क्षीरसागर यांचे बरेच कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. मराठी साहित्य संमेलनाच्या त्या सक्रीय सदस्या आहेत . त्यांचाही शासनाने उचित सन्मान करावा. अशी मागणी करून अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी पुरस्काराच्या मानकरी सौ. विमलताई सिद्राम माळी, सौ. शांताबाई व्यंकटेश क्षीरसागर यांना शुभेच्छा दिल्या. 

मंचकावरील विठ्ठल (आबा) तोडकर (लातूर), संजय इनामदार (सोलापूर), अमर बोराटे (पुणे), विलास माळी (ठाणे) संतोष गायकवाड (सोलापूर), भाऊसाहेब झगडे (सोलापूर), कैलास जामगडे (नागपूर), दादा महाराज वसेकर (सावता महाराज यांचे वंशज), गणेश वसेकर, दामू माळी, पोपट वसेकर, माजी सरपंच विजया वसेकर, शामल गोरे, गौतम क्षिरसागर (उस्मानाबाद), सोपान खारे इ. मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

आद्य कवियत्री सावित्रीमाई फुले राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने सौ. विमलताई माळी व सौ. शांताबाई क्षीरसागर यांचे सर्वत्र कौतुक, अभिनंदन, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आद्य कवियत्री सावित्रीमाई फुले राष्ट्रीय पुरस्काराने सौ. विमलताई माळी व सौ. शांताबाई क्षीरसागर सन्मानित ! आद्य कवियत्री सावित्रीमाई फुले राष्ट्रीय पुरस्काराने सौ. विमलताई माळी व सौ. शांताबाई क्षीरसागर सन्मानित ! Reviewed by सह्याद्री चौफेर on May 01, 2022 Rating: 5
Powered by Blogger.