बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर
उदगीर : मराठा शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाऱ्या श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालय उदगीर येथे महाराष्ट्र दिन नुकताच साजरा करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक राजाराम भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडी मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच शाळेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुण पत्रकाचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन कार्यक्रम संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 01, 2022
Rating:
