बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर
उदगीर : पवित्र रमजान ईद निमित्त उदगीर येथील इदगाह मैदानावर 'ईद उल फित्र' चा नमाज आदा करण्यासाठी मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र येतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने समाज बांधवांना नमाज आदा करताना उन्हाचा त्रास होण्याची शक्यता आहे.
या करिता संपूर्ण ईदगाह मैदानावर मंडप टाकण्याची मागणी जन परिवर्तन सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आली. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व शहरातील मुस्लीम समाजाच्या सर्व स्मशान भूमीची साफसफाई करण्याची ही मागणी उदगीर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे जन परिवर्तन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अझरोद्दीन शमशोद्दीन शेख यांनी केली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्य मंत्री ना संजयजी बनसोडे यांना निवेदन दिले असता त्यांनी तात्काल उदगीर नगर परिषद प्रशासनास मंडप टाकण्या करिता आदेशित केले.
ईदगाह मैदानावर मंडप टाकण्याची जन परिवर्तन सेवाभावी संस्थेची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 01, 2022
Rating:
