वाढदिवसाचा अवाजवी खर्च टाळुन, अशोक चौधरी यांचा आगळा-वेगळा उपक्रम


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : तालुक्यातील ढोक (वाई) येथील मा.मुख्याध्यापक अशोक चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. सेवा देत असताना देशाचे भवितव्य घडविणारे विद्यार्थी घडविणे हे परम कर्तव्य पार करित असताना समाजाची जान असणारे फार कमी शिक्षक असतात,त्यापैकी ढोकी (वाई) येथील आदर्श मुख्याध्यापक अशोक चौधरी यांनी आपल्या ५९ व्या जन्मदिवसाचे औचित्य साधत कुठलाही अवाजवी खर्च न करता, जन्मभुमी असलेल्या ढोकी(वाई)येथील,५० विधवा व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून,साडी-चोळीचे वाटप करण्यात आले.

अत्यंत खडतर परिस्थितीतुन जिवन काढुन,ढोकी(वाई) गावाचे नाव राज्य पातळीपर्यंत पोहचविले.हिच जान मनात ठेवून, आपल्यावरील असलेले ॠण फोडण्याचे छोटासा प्रयत्न वाढदिवसानिमित्त मा.मुख्याध्यापक अशोक चौधरी यांनी केला आहे. यावेळी गावातील जेष्ठ नागरीक मनोजसिंग काळे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन,कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

यावेळी गावातील महिलांना साडी-चोळीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम सुत्रसंचालन निलेश चौधरी तर आभार जगदिपसिंग काळे यांनी केली. यावेळी गावातील रामभाऊ राऊत,विक्रमसिंह डोंगरे,अशोक भोयर,राहुलसिंग काळे,सुनिल ठाकरे,रणजित चिकनकर, मंगल राऊत, विशाल बोंडे,दिनेश चौधरी,निखिल चिकनकर, राहुल चिकनकरसह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
वाढदिवसाचा अवाजवी खर्च टाळुन, अशोक चौधरी यांचा आगळा-वेगळा उपक्रम वाढदिवसाचा अवाजवी खर्च टाळुन, अशोक चौधरी यांचा आगळा-वेगळा उपक्रम Reviewed by सह्याद्री चौफेर on May 02, 2022 Rating: 5
Powered by Blogger.