बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर
या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजाराम भोसले यांच्यासह विचारपीठावर शाळेतील शिक्षिका कुसुम फरकांडे व शिक्षक बालाजी सुवर्णकार उपस्थित होते याप्रसंगी शाळेच्या वतीने कालिदास सोमवंशी व त्यांच्या सुविद्य पत्नी आनीता सोमवंशी यांना शाळेच्या वतीने सन्मानपत्र व शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बालाजी सुवर्णकार, कुसुम फरकांडे व यांची समयोचित भाषणे झाली. या प्रसंगी कालिदास सोमवंशी यांनी आपल्या सेवेच्या कालावधीत केलेल्या कार्याची माहिती दिली व यापुढेही मी शाळेच्या कार्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले मुख्याध्यापक राजाराम भोसले यांनीही कालिदास सोमवंशी यांच्या केलेल्या कार्याचा गौरव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका मीना गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका सुनिता तेलंग यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
सेवानिवृत्ती बद्दल सोमवंशी कालिदास यांचा सन्मान सोहळा संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 02, 2022
Rating:
