Top News

उदगीरात कै. विठ्ठलराव केदार राज्यस्तरीय वाड्.मय पुरस्कार वितरण


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : तालुक्यातील देऊळवाडी येथील कै. विठ्ठलराव केदार प्रतिष्ठान चे प्रोढ व बाल वाड्.मय राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व अंबादास केदार लिखित तारांबळ या आत्मकथनाचे प्रकाशन ८९ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते  मंगळवारी येथील लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या सभागृहात पार पडले.

अध्यक्षस्थानी जि. प. चे माजी अध्यक्ष राहुल केंद्र होते. व्यासपीठावर मसापचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामचंद्र तिरूके, डॉ. रामप्रसाद लखोटीया, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर, ललिता सबनीस, लेखक अंबादास केदार यांची उपस्थिती होती. यावेळी कोल्हापूर येथील साहित्यिक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या ऊसकोंडी या कादंबरीला, बीड येथील डॉ. भास्कर बडे यांच्या बाईचा दगड या कथासंग्रहास, बाळासाहेब कांबळे यांच्या भिनवाडा या कादंबरीस, हबीब भंडारे यांच्या जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता व अंकुश सिदगीकर यांच्या काळोखाचे कैदी या कविता संग्रहाचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

बालवाङमय पुरस्कारासाठी पुणे येथील शिवाजी चाळक यांच्या उंदरांचा टांगा या बालकविता संग्रहास, हिंगोली येथील बबन शिंदे यांच्या जगावेगळा कीर्तनकार या बाल कादंबरीस, नांदेड येथील लेखिका कमल कदम यांच्या आरपार या आत्मकथनासाठी तर सिराज शिकलगार यांच्या गझलतारा या गझल संग्रहास तर सुप्रिया दापके यांच्या सानुल्याच्या कथा या कथासंग्रहाचा गौरव करण्यात आला. प्रत्येकी दोन हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल धनंजय गुडसूरकर, परिक्षक प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, रसूल पठाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक रामदास केदार यांनी केले. सूत्रसंचालन नीता मोरे यांनी तर आभार प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांनी मानले. यासाठी एकनाथ केदार, देविदास केदार,  प्रा. बिभीषण मद्देवाड, सिध्दार्थ सुर्यवंशी, लक्ष्मण बेंबडे, प्रा. राजपाल पाटील, विवेक होळसंबरे, ॲड. महेश मळगे, विक्रम हलकीकर आदींनी पुढाकार घेतला. 
Previous Post Next Post