पुरवठा विभागातील RCMS प्रणाली बंद, शिधापत्रिकाधारक लाभापासून वंचित...

चेतन पवार  सह्याद्री चौफेर 

दारव्हा : दारव्हा...तहसीलदार दारव्हा कार्यालयातील (RCMS) ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली तीन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिक स्वस्त धान्यापासून वंचित आहे. ही प्रणाली बंद असल्याने पिवळ्या व केसरी कार्डावर अनेक आजारांवर मोफत वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करुन आरोग्य सुविधा घ्याव्या लागत आहेत.

दारव्हा तहसील कार्यालयात दररोज ४० ते ५० नागरीक विविध कामे करून घेण्यासाठी येत असतात मात्र, पुरवठा विभातील RCMS प्रणाली बंद असल्याने ते नागरिक संबंधित कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतांना पहावयास मिळत आहे. अनेकवेळा त्यांच्यातील वाद टोकाला जात असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

तालुक्यासह संपूर्ण जिल्हयात केसरी व पिवळ्या कार्डावर धान्य मिळण्यासाठी १२ अंकी नंबर घेणे, तो मिळाल्यानंतर RCMS द्वारे रजिस्ट्रेशन करणे, मुलामुलींचे विवाह झाल्यानंतर माहेरचे नाव ऑफलाईन कमी केले असले तरी ते ऑनलाईन कमी करणे, पाल्यांचे नाव समावेश करणे, आरोग्य सुविधेसाठी ऑनलाईन दाखले घेणे • यासाठी ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीची गरज भासत असते मात्र दारव्हा येथील पुरवठा विभागात गेल्या तीन महिन्यांपासून ही प्रणाली बंद असल्याने प्रचंड हाल होत आहे.ही प्रणाली सुरळीत चालू व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे.

पुरवठा अधिकारी म्हणतात राज्यात प्रणाली बंद

ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली तीन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांचे कामे होत नसल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन असता सुधाकर पवार यांनी ही प्रणाली संपर्क राज्यभर बंद असून त्या आमच्याकडे काही उपाय नसल्याचे सांगितले.
पुरवठा विभागातील RCMS प्रणाली बंद, शिधापत्रिकाधारक लाभापासून वंचित... पुरवठा विभागातील RCMS प्रणाली बंद, शिधापत्रिकाधारक लाभापासून वंचित... Reviewed by सह्याद्री चौफेर on May 26, 2022 Rating: 5
Powered by Blogger.