ट्रकांच्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू तर,एक गंभीर जखमी

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : खैरी-कोसरा रोडवर आज गुरुवारला दोन ट्रक समोरासमोर धडक दिल्याने दोन्ही कॅबिनचा चुराडा झाला असून घटनास्थळी एकच गर्दी उसळली होती. ही घटना सकाळी साडे नऊ च्या सुमारास घडली.

खैरी कोसारा या मार्गांवर जड वाहतूक मोठया प्रमाणात होत असते. चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा हा मार्ग असून या रोड वर कोळसा रेतीची वाहतूक पैज लावल्यागत होत असते. आज गुरुवारला सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास खैरीहुन एम एच ३४ बी जी ०७९९ या क्रमांकाचा कोळशाने भरलेला ट्रक वरोराकडे जात होता. अशातच वरोराहुन खैरी कडे ट्रक क्र. एम एच ३४ ए बी ९७९९ हा सुद्धा येत होता, कोसारा ते खैरी दरम्यान एका वळणावर भरधाव दोन्ही ट्रकांची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही ट्रकच्या कॅबिनचा चुराडा झाला.
ही धडक जोरदार असल्याने दोन्ही वाहणातील चालक कॅबिनमध्ये अडकले होते. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला, वृत्त लिहीस्तोवर मृतकाची व जखमीची ओळख पटली नसून घटनास्थळी वडकी पोलीस दाखल झाले होते. 
ट्रकांच्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू तर,एक गंभीर जखमी ट्रकांच्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू तर,एक गंभीर जखमी Reviewed by सह्याद्री चौफेर on May 26, 2022 Rating: 5
Powered by Blogger.