चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : तालुक्यातील मान्सून कालावधीत विशेषतः जून व जुलै या महिन्यात वीज पडून जिवीतहानी होत असते. वीज पडून जिवीतहानी होऊ नये, या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी 'दामिनी' अॅप तयार केले आहे. हे दामिनी अॅप वीज पडण्याची सूचना देणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी अॅप वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सदरचे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.
सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना तसेच शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, गावस्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंन्ट्री ऑपरेटर यांना सदरचे अॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करण्यात यावे. तसेच सदरचे अॅप (GPS) लोकेशन ने काम करीत असून विज पडण्याच्या १५ मिनिटापूर्वी सदरच्या अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते.
ॲपमध्ये आपले सभोवताल वीज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासून सुरक्षीत स्थळी जावे. तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी कर्मचारी यांना सदर अॅप डाऊनलोड नागरिकांना देऊन होणारी जीवितहानी टाळावी, असे आवाहन (तहसीलदार) तालुका दंडाधिकारी यांनी केले.
वीज पडण्याची सूचना देणारी 'दामिनी'
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 25, 2022
Rating:
