व्यसनापासून दूर रहा, सुखी जीवनाची सूत्रे गवसायाला वेळ लागणार नाहीत - अनिल डोंगरे

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : पूजनीय शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर च्या माध्यमातून गोंडपिपरी येथील पुरुषोत्तम ठाकूर यांच्या गृहप्रवेश वास्तु पूजनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून व्यसनमुक्ती, मार्गदर्शन व सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल डोंगरे जिल्हाध्यक्ष परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना. कार्यक्रमाचे उद्घाटक भाऊराव ठाकरे जिल्हा अध्यक्ष गडचिरोली, प्रमुख अतिथी दिगंबर वासेकर जिल्हा संघटक, भालचंद्र रोहणकर जिल्हा प्रचारक, श्री प्रकाश अल्गमकर,श्री दिपक ठाकरे, श्री आकाश शिरसागर,श्री अशोक पटेल,श्री भोजराज एकोणकार,श्री मारुती वाकुलकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

मार्गदर्शनपर कार्यक्रमात बोलताना डोंगरे म्हणाले की, दारूच्या आहारी गेलेले लोक समाजात आपला मान सन्मान वाढवू शकत नाही,आपल्या परिवारास सुख समाधान,ऐश्वर्य देवू शकत नाही, मात्र व्यसन मुक्त होण्याचा एकदा का निर्धार केला तर "नांदा सौख्यभरे..." सुखी जीवनाची सूत्रे गवसायला वेळ लागणार नाही.
पुढे बोलताना, व्यसनमुक्ती मुळेच आज वास्तु व पूजनाच्या कार्यक्रम आयोजन करण्यात आला त्या निमित्ताने घरचे प्रमुख व्यक्ती नऊ वर्षापूर्वी दारू व्यसनाच्या आहारी गेले होते, त्यांनी परमपूज्य शेषराव महाराज यांचा दारू व्यसनमुक्तीचा संकल्प घेतला आणि ते दारू व्यसन मुक्त झाले. आज ते आपली स्वतः व्यथा मांडत असताना एके काळी ते झोपडीतच राहायचे, त्यांचे मानधन 9000 हजार. मी जर दारू पीत राहिलो असतो  तर एवढे सुंदर पंधरा लाखाचे घर बांधू शकलो नसतो.
आज कित्येक परिवार या दारू व्यसनामुळे उध्वस्त झाले आहे त्यांचे मुले बाळे रस्त्यावर आले आहे.या संघटनेच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाज घडवण्याकरिता हे कार्य जोमात सुरू आहे असे ते या प्रसंगी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमांतर्गत सौ कुसुम पुरूषोत्तम ठाकूर या दाम्पत्याचा व कुमारी प्रतीक्षा घ्यार यांचा जिल्हा संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.
व्यसनापासून दूर रहा, सुखी जीवनाची सूत्रे गवसायाला वेळ लागणार नाहीत - अनिल डोंगरे व्यसनापासून दूर रहा, सुखी जीवनाची सूत्रे गवसायाला वेळ लागणार नाहीत - अनिल डोंगरे Reviewed by सह्याद्री चौफेर on May 27, 2022 Rating: 5
Powered by Blogger.