सह्याद्री चौफेर | बालाजी सुवर्णकार
उदगीर : लोकनेते विलासरावजी देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप चे आयोजन विजय राजेश्वर निटूरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते, यात उदगीर शहर व ग्रामीण भागातून जवळपास 40 ते 45 संघानी सहभाग नोंदविला होता.
covid-19 या महामारी मुळे काही काळ अश्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते पण या स्पर्धेमुळे खेळाडूंना एक नवऊर्जा मिळालेली दिसून आली.याबरोबरच उदगीर येथील प्रेक्षक वर्गांनी याचा मोठ्या प्रमाणात आंनद घेतला.या स्पर्धेत अंतिम सामना हा निडेबन टीम,निडेबन विरुद्ध नक्ष्या टीम,उदगीर यांच्या मध्ये अत्यंत चुरशीचा सामना झाला.या अंतिम सामन्यात नक्ष्या टीम,उदगीरने 8 खेळाडू राखून विजय मिळवला.विजय मिळवलेल्या टीमला लोकनेते विलासरावजी देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप समितीच्या वतीने रोख रक्कम 51000 (एक्कावन हजार रुपये) ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.तर द्वितीय आलेल्या टीमला रोख रक्कम 31000 (एकतीस हजार रुपये) ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून अबू पठाण यांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रोहन येणालडे यांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तर मालिकावीर म्हणून रुपेश तुकडे यांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेत प्रथम आलेल्या टीमची निवड ही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण करण्यासाठी काँग्रेस कमिटी उदगीरचे ता.अध्यक्ष श्री.कल्याण पाटील साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीरचे सभापती मुन्ना उर्फ सिद्धेश्वर पाटील साहेब, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.विजय निटुरे साहेब, उदगीर काँग्रेस कमिटी उदगीर श.अध्यक्ष श्री.मंजूर खा पठाण साहेब, महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस सौ.उषा कांबळे, शिक्षक काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष्या बालिका मुळे, शहर काँग्रेस कमिटी महिला अध्यक्षा ललिता झिल्हे, विलास सहकारी साखर कारखाना संचालक श्री.नाना ढगे, मा.न.प.सदस्य व्यंकट बोईनवाड, रेखाताई कानंमदे, काँग्रेस नेते शिवाजी लाखवाले, प्रा.गोविंद भालेराव प्रा.शिवाजीराव देवनाळे, संदीप पाटील, अमोल घुमाडे, दत्ता सुरनर, संजय काळे, संतोष वळसणे, श्रीनिवास एकुर्केकर, नागेश पटवारी, सद्दाम बागवान, विपिन जाधव, आशिष चंदेले, प्रकाश गायकवाड, फय्याज डांगे, आदर्श पिंपरे, रामजी पिंपरे, शिवाजी पकोळे, एशवंत पाटील, ईश्वर समगे, शेख जावेद, दत्ता सगर, अजय कबाडे, राहुल सातापुरे, बंटी कसबे, राहुल सुतार, सागर राठोड, नासिर शेख याबरोबरच काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप उत्साहात संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 24, 2022
Rating:
