टॉप बातम्या

चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने ५ गरजू कुटुंबांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे वाटप


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : येथील सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या अग्रगण्य अशा चंदरआण्णा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी मागच्या 4-5 वर्षांपासून सहकार महर्षी चंद्रकांतआण्णा वैजापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान किटचे वाटप, अनेकवेळा रक्तदान शिबिराचे आयोजन, वृक्षारोपण कार्यक्रम, पाणपोईची सुविधा, आतापर्यंत 50 कुटुंबांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे वाटप इत्यादी एकापेक्षा एक स्तुत्य कार्यक्रम घेतलेले आहेत. आजच्या कार्यक्रमातही गरजू पाच कुटुंबांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये रोख वाटप करण्यात आले याच बरोबर सुप्रसिद्ध उद्योजिका श्रीमती विमलताई गर्जे यांच्या मुलाच्या 17 व्या लग्न वाढदिवसानिमित्त उपस्थितीत मान्यवराच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी मा.चंद्रकांतआण्णा वैजापुरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी प्रविणजी मेगशेट्टी साहेब, शासकीय रुग्णालयाचे डिन डाॅ.दत्तात्रय पवार साहेब, चंदरअण्णा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, डाॅ.सोमवंशी साहेब, डाॅ.प्रकाश येरमे साहेब, डाॅ.संदीप सोनटक्के, माजी नगराध्यक्षा उषाताई काबंळे, उद्योगपती विमलताई गर्जे, शंकरराव लासूने, शिवकुमार गुळंगे, भगवानराव पाटील गगंनबीडकर, श्रीराम गर्जे, सौ.सोनाली गर्जे, सौ.गायत्री गर्जे, बालाजी पाटील नेत्रगावकर, राजकुमार बिराजदार बामणीकर, प्रा.सिद्धेश्वर पटने, प्रा.संजय जामकर सर, प्रा.संतोष चौधरी, भरत पस्तापुरे, रमेश कंटे, अशोक काबंळे, पञकार सुरेश पाटील नेञगावकर, सुनील हवा, संगम पटवारी, पत्रकार डावळे, पत्रकार गुट्टे, मुख्याध्यापक हक्कानी पाशा, प्रा.अख्तार सर, खिंडिवाले सर,माधव पाटील चिघळीकर, सचिन वाघमारे, तानाजी जाधव, प्रा.महेश धनश्री, ऐतवार सर, कल्याण बिरादार, रमेश खंडोमलके, संगुळगे सर, मुन्ना सुर्यवंशी, सुनील रासुरे, सत्यप्रकाश डांगे, तुकाराम शिंदे, सुवर्णकार, अजित काबंळे, महादेव महाजन अविनाश खरात, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय अशा सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचलन प्रा.सिद्धेश्वर पटणे, प्रास्ताविक अशोकराव कांबळे तर आभार प्रदर्शन प्रा.संजय जामकर यांनी केले.
Previous Post Next Post