२२ वर्षापासून जमिनीचा मोबदला नाही; शेतकरी बसले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला

योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : सुर्ला, अनंतपूर व गोधणी येथील शेतक-यांनी शासनाला सुर्ला ते गोधणी रस्त्याकरीता जमिनी दिल्या. या दोन गावांना जोडणारा ग्रामीण रस्ता निर्माण करण्यात आला. परंतू या जमीनीचा आर्थिक मोबदला मिळावा यासाठी सन २००३ पासून म्हणजे १८ वर्षापासून निवेदनाच्या माध्यमातून पायपीट करून सुध्दा उपविभागीय कार्यालय पांढरकवडा लक्ष देत नाही म्हणून जमीनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सुर्ला, अनंतपूर व गोधणी येथील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे.

झरी जामणी तालुक्यातील सुर्ला, अनंतपूर व गोधणी येथील बाधित शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला देण्यात आला नाही याबाबत आदिवासी शेतकऱ्यांनी वारंवार उपविभागीय कार्यालय पांढरकवडा व तहसील प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती. या शेतकऱ्यांनी वेळोवेळी तहसील कार्यालय केळापूर येथे चकरा मारत असतांना अधिकाऱ्यांकडून उलट सुलट उत्तरे शेतकरी बांधवाला ऐकायला मिळतात. असा आरोप शेतकऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केला आहे.
विशेष म्हणजे सन २००३ पासून या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. परंतु आज रोजी १८ वर्षे लोटली १ कोटी ७१ लाख रूपये २०१९ मध्ये ६० टक्के निधी प्राप्त झाला असून, तो शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला नाही. २७ पैकी काही शेतकरी तब्येतीमुळे मृत्यु पावले. तर काही खाटेवर पडून आहे. ह्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुध्दा हलाखीची असून त्यांचे जीवन शेतीवरच अवलंबून आहे. हातावर आणणे व पानावर खाणे असा शेतकऱ्याचा जीवनक्रम आहे. प्रत्येक शेतक-याची दीड एकर ते दोन एकर जमीन रस्त्यासाठी गेली आहे.
मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती उत्पन्नात सुध्दा घट झाली आहे. आजच्या बाजार भावाप्रमाणे शेत जमीनीचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी करीत १५ शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे. यावर जिल्हाधिकारी शेतकऱ्यांना काय न्याय देतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
२२ वर्षापासून जमिनीचा मोबदला नाही; शेतकरी बसले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला २२ वर्षापासून जमिनीचा मोबदला नाही; शेतकरी बसले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला Reviewed by सह्याद्री चौफेर on May 25, 2022 Rating: 5
Powered by Blogger.