कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
चंद्रपूर : शहरापासून जवळच असलेल्या ग्रामीण भागाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी "पडोली फाटा" या चौकातील आजूबाजूच्या गाव खेड्यातून येणार्या लोकांची नेहमी वर्दळ असतात.
अशावेळी लोकांना 48 डिग्री उष्ण तापमानात पिण्याच्या पाण्यासाठी कुठे वणवण भटकावे लागू नये यासाठी मा. आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री तथा लोक लेखा समिती प्रमुख विधिमंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सेवा संकल्पनेतून व प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा चे अनिल डोंगरे यांचे आयोजनातून पडोली फाटा चौक येथील शुद्ध थंड आरो ट्रीटमेंट पाणपोई च्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
दररोज या पाणपोईत विस कॅन ॲटोद्वारे आणून ठेवण्यात येतात. या पाणपोई मुळे येथील ऑटो चालक, व्यापारी वर्ग, कामगार आणि बाहेरून आलेली व्यक्ती तहान भागवीत असतात.
या सध्याच्या उष्ण तापमानात जीवाची लाही लाही होत असतांना या शुद्ध,थंड पाणपोई पाणपोई माध्यमातून थकून-भागून आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे तहान भागविल्या जात असून आयोजनातून शुद्ध,थंड व आरओ पाणपोईचा नागरिकांना दिलासा मिळाला.
शुद्ध थंड आरओ पाणपोईचा नागरिकांना मिळाला दिलासा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 23, 2022
Rating:
