पहापळ येथील पीडित कुटुंबाची सांत्वनपर घेतली भेट


सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : आज पहापळ येथील पीडित कुटुंबियांची सामाजिक कार्यकर्ते धनंजय आसुटकर यांनी भेट घेतली. पहापळ येथे जाऊन पीडित कुटुंबाची विचारपूस केली व समोरील न्यायिक लढ्यात मी सहभागी आहो असा शब्द देत आज त्यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. महत्वाचे तीन विषय तक्रारी मध्ये करण्यात आले. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील ५ वर्षीय बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचारातील घटनेची चौकशी करावी. दुसरा मुद्दा असा की, संबंधित खटला फास्ट ट्रॅक प्रणालीने चालविण्यात यावा. व मारेगाव तालुक्यात विशेष करून ग्रामीण भागात Digital Petrolling (गस्त) प्रणाली द्वारे करण्यासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांचे कडे निवेदनातून साकडे घातले आहे. 
आठवड्यात तालुक्यातील पहापळ येथे झालेल्या सहा वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराबाबत पीडित कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी धनंजय आसूटकर, मार्डी पोलीस पाटील तथा डॉ प्रशांत पाटील व अमोल कुमरे हे उपस्थित होते.
पहापळ येथील पीडित कुटुंबाची सांत्वनपर घेतली भेट पहापळ येथील पीडित कुटुंबाची सांत्वनपर घेतली भेट Reviewed by सह्याद्री चौफेर on May 22, 2022 Rating: 5
Powered by Blogger.