टॉप बातम्या

भीषण अपघात: ट्रक आणि दुचाकी समोरासमोर धडक, 47 वर्षीय तरुण जागीच ठार



सह्याद्री चौफेर | चंदू राऊत 

मारेगाव : तालुक्यातील मच्छिन्द्रा येथील 47 वर्षीय विवाहित तरुण मच्छिन्द्रा वनोजा (देवी) रोड वरील ट्रक च्या धडकेत जागीच ठार झाला. घटनेची वार्ता परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली. 

दिनेश गजानन मत्ते असे ट्रक अपघातात मरण पावलेल्या इसमाचे नाव आहे. मच्छिन्द्रा कडून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच 34 बि जी 1113 या भरधाव ट्रक ची वाघाडा पुलाच्या समोर दुचाकीस्वाराला समोरासमोर जबरदस्त धडक होऊन दिनेश मत्ते हा जागीच ठार झाला आहे. ही घटना 5:30 वाजताच्या दरम्यान घडली. वृत्त लिहेपर्यंत पोलीस घटना स्थळी दाखल व्हायची होती.

दिनेश यांच्या पश्चात पत्नी, आई वडील, तीन मोठे भाऊ व दोन मुली असा आप्त परिवार आहे.
Previous Post Next Post