कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मारेगाव : तालुक्यासह वणी उपविभागात बहुतांश प्रशासकिय कार्यालये प्रभारावर असल्याने जनतेच्या कामाचा खोळंबा मोठ्या प्रमाणात होत असुन तहसिल कार्यालय, भुमीअभिलेख, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, नगरपंचायत, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये प्रभार आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याने जनतेला गैरसोयीचा सामना करावा लागत असून, जनतेनी भरघोस मतांनी निवडुन दिलेला आमदार या प्रशासकीय गलथान कारभाराला जबाबदार असल्याचा घानाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याउपाध्यक्ष तथा वणी विधानसभा क्षेत्राचे नेते राजुभाऊ उंबरकर यांनी मारेगाव विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये शनिवारी दि. २१ मे ला केला आहे.
वेगाव येथील युवा शेतकऱ्यांने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणी करण्यासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात सकाळ पासुन डॉक्टर अभावी ताटकळत रहाल्याने मृतदेहाची अवहेलना झाल्याची घटना शनिवारी घडल्याने नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला. ग्रामीण रुग्णालयातील या घटनेची माहिती मिळताच मनसेचे राज्याउपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर ग्रामीण रुग्णालय गाठत प्रशासकीय व्यवस्थेच्या गलथान कारभाराचा जाहीर निषेध करीत,या गलथान कारभाराला स्थानिक आमदार संजीवरेड्डी बोतकुरवार जबाबदार असल्याचा पाढा वाचत निष्क्रिय आमदार महोदयांनी राजिनामा द्यावा असा घाणाघाती आरोप राजुभाऊ उंबरकर यांनी विश्रामगृह मारेगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये केला आहे. संपुर्ण मतदार संघात आमदाराचे दुर्लक्ष असल्याने जनता प्रशासकीय कार्यालयाच्या आडमुठ्या धोरणाला बळी पडत आहे. येत्या आठ दिवसात ग्रामीण रुग्णालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची व्यवस्था न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना २९ मे पासुन तिव्र आंदोलन करुन लोकप्रतिनिधी व शासनास वटणी वर आणल्याशिवाय रहाणार नाही.
मारेगाव, वणी, झरी हा उपविभाग सर्वात जास्त महसुल देणारा असल्याने इथल्या महसुलचा लाभ लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनाच जास्त होत असल्याचा खोचक टोला सुध्दा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्ना दरम्यान दिला, दोन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नगरपंचायत मध्ये गेल्या चार वर्षांपासून कायम स्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने शहराच्या विकास कामात बाधा निर्माण झाली. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारऱ्या बरोबर कर्मचारी नाही, कृषी विभाग प्रभारावर, भुमीअभिलेख प्रभारावर, पंचायत समिती प्रभारावर, सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी हजर नसतात, विजेचा लपंडाव, तहसील कार्यालयात एकच नायब तहसिलदार असुन जनता या प्रभारी कारभाराने त्रस्त आहे.
तालुक्यातील समस्याचा आढावा न घेणाऱ्या आमदार महोदयानी सुरु असलेल्या गलथान कारभाराला आपणच जबाबदार आहो ही जाणीव ठेवून आमदार महोदयांनी राजिनामा द्यावा. जनतेची कामे ईमाने ईतबारे करुन होणारी गैरसोय थांबवावी अन्यथा येत्या आठ दिवसांत मनसेचा दणका आंदोलनातुन दिसेल, याला पुर्ण जबाबदार वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार व शासन राहील असा इशारा पत्रकार परिषदेमधून राजु उंबरकर यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, धनंजय त्रिंबके, किन्हाळा येथील सरपंच शुभम भोयर, बोरीचे सरपंच प्रविण नान्ने, चांद बहादे, जम्मू, जमीर सय्यद,आकाश खामनकर, ईब्राहिम शेख, सौरव सोयाम, निखिल मेहता उपस्थित होते.
प्रशासकीय व्यवस्था प्रभारावर असल्याने आमदारांनी राजीनामा द्यावा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 22, 2022
Rating:
