टॉप बातम्या

वेगाव शिवारात युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील वेगाव येथील शेत शिवारात आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास एका युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

राजेंद्र वामन गौरकार  (३०) रा. वेगाव असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या मृत युवा शेतकऱ्याचे नाव आहे.

 तालुक्यातील वेगाव येथील राजेंद्र गौरकार हा वेगाव येथे आपल्या कुटुंबियांसोब राहत होता. आज शनिवार अचानक राजेंद्र गौरकार हा स्वतः च्या वेगाव शेतशिवारात असलेल्या  शेतामधील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच शेताच्या दिशेने लोकांनी धाव घेतली. पोलिसही घटनेच्या ठिकाणी पोहचून घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृत्यूदेह उत्तरीय तपासणीकरिता मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
राजेंद्र च्या आत्महत्या चे कारण अस्पष्ट असून, राजेंद्र यांच्या पाठीमागे आई वडील भाऊ असा आप्तवर परिवार आहे.
Previous Post Next Post