टॉप बातम्या

"त्या" आमरण उपोषणाला "वंचित" चा पाठिंबा


सह्याद्री | चौफेर न्यूज 

वणी : रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून संपूर्ण रस्ता बंद केल्याने शेजारी राहणाऱ्या परिवाराने त्या व्यक्ती विरोधात अनेक तक्रारी केल्यानंतर ही प्रशासन दुर्लक्ष करित असल्याने निळापूरवासी धर्मदेव काटकर व त्यांची पत्नी शेवंताबाई काटकर यांनी 18 मे पासून वणी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.

घराकडे येणारा रस्ता विरोधकांनी बंद केला. इतकेचं नाही तर त्यांनी अनेकदा ग्रा.प. ला अर्ज विनंत्या करुन देखील त्यांना त्यांचे घरापर्यंत नळ देखील दिला नाही. त्यामुळे काटकर कुटुंब आपल्या न्यायासाठी गेली तीन दिवसापासून कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे.
हे प्रकरण प्रशासनाने गांभीर्याने घेतले नसल्यामुळे त्यांच्या न्याय मागणीला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते धनंजय आसुटकर हे उपस्थिती होती.
Previous Post Next Post