बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर
उदगीर : मराठा शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत चालणाऱ्या श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालय उदगीर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे औचित्य साधून भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राजाराम भोसले तर प्रमुख वक्त्या म्हणून लालबहादूर शास्त्री विद्यालयातील साहित्यिका तथा कवियत्री नीता मोरे व शाळेतील शिक्षिका श्रीमती अनुसया मोरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या जयंती प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांची भाषणे झाली व प्रमुख वक्त्या नीता मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून, डॉ.बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र अभ्यास करून आपण उज्वल यश संपादन करून उच्चपदावर स्थानापन्न व्हावेत असा मौलिक सल्ला दिला. प्रमुख पाहुणे अनुसया मोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोप प्रसंगी मुख्याध्यापक राजाराम भोसले यांनीही आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श घेऊन आपले जीवनमान उंचविवेत असेही ते म्हणाले . स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून शाळेतील सहशिक्षक श्री शिवाजी दाडगे व महेश जगळपूरे यांनी केले या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेतील सहशिक्षिका मीना गायकवाड यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वच शिक्षकांनी पुढाकार घेतला.
जयंतीनिमित्त विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयात भाषण स्पर्धा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 19, 2022
Rating:
