सुवर्णकार बालाजी | सह्याद्री चौफेर
उदगीर : 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे संपन्न होत असून सुवर्णकार समाजातील एक सेवानिवृत्त आदर्श शिक्षक कवी, साहित्यिक व्यंकटेश काटकर नांदेड यांचे रविवार, दिनांक 24 एप्रिल रोजी कवी कट्टयावर कविता सादर करण्यात येत असून ते मराठी साहित्य संमेलनात "माझ्या कशी विसरू मी आई" हि सुंदर कविता सादरीकरण करणार आहेत. तरी उदगीर परिसरातील सुवर्णकार समाज बांधव-भगिनींनी ही कविता ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बालाजी सुवर्णकर, विजय कुमार पेणुरकर, सुरेश आंबेकर, अमोल नखाते, सचिन पोदार , अच्युत पंडित, भागवत पोतदार, स्मिता पोतदार, अर्चना पेनुरकर, भारतीबाई रत्नपारखी, राजेंद्र रत्नपारखी, महानंदा सुवर्णकार, सारिका सुवर्णकार, सुरेखा केजकर इत्यादींनी केले असून त्यांच्या या कवितेच्या निवडीबद्दल सुवर्णकार समाजात सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे..
नांदेड येथील कवी व्यंकटेश काटकर यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीरचे निमंत्रण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 19, 2022
Rating:
