आटो पलटी होऊन तिघे जण गंभीर जखमी

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर

मारेगाव : मारेगाव रोड बाजारासाठी प्रवासी घेवून येत असतांना आटो पलटी होऊन तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज मंगळवार रोजी दुपारी २:३० वाजता च्या दरम्यान घडली.

सविस्तर असे की, म्हैसदोडका वरून करणवाडी ते मारेगाव रोड बाजाराला प्रवाशी घेऊन येत असताना शहराच्या नजीक अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सूटल्याने आटो पलटी झाला. त्यातील तिन प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना ताबडतोब मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अनिता बुसुरू आत्राम (३५) रा.म्हैसदोडका, मनोज सुभाष अडसकर (३७) रा. गोंडबुराडा व नत्थू विठो कोवले रा. करनवाडी असे जखमींचे नाव असुन, त्यांच्यावर मारेगाव ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आल्याची माहिती आहे.
आटो पलटी होऊन तिघे जण गंभीर जखमी आटो पलटी होऊन तिघे जण गंभीर जखमी Reviewed by सह्याद्री चौफेर on April 19, 2022 Rating: 5
Powered by Blogger.